गदा अन् मशाल घेऊन एक मर्द दिल्लीत पाठवायचा; ठाकरे गटात येताच चंद्रहार पाटलांची थेट उमेदवारी जाहीर!
Uddhav Thackeray : पैलवान चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडून त्यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशावेळी सांगली लोकसभा साठी पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेने संकेत दिल्यानंतर आता गदा आणि मशाल हातात घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे.
शरद पवार गटात प्रवेशाच्या अफवा पण लंकेंच्या चेहऱ्यावर भलतंच टेन्शन!
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, छाती किती इंचाची झाली ते माहित नाही. पण या मर्दाची छाती बघून सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाही. तसेच पक्षातून पळकुटे नामर्द पळून जात आहेत. पण मर्द शिवसेनेत येत आहेत. असं म्हणत यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या रविंद्र वायकरांना देखील टोला लगावला आहे.
Emraan Hashmi: ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटातील इमरानचा पहिला लूक रिलीज; अभिनेता दिसणार ‘या’ भूमिकेत
शिवसेना ही नेहमी महाराजांची संघटना आहे. माझ्या लहानपणी मारुती माने हे घरी यायचे ते दिवस आठवले. तीच परंपरा आजही कायम आहे आज डबल महाराष्ट्र केसरी शिवसेनेत आले आहेत. यावेळी उपस्थितांनी अब की बार चंद्रहार अशा घोषणा दिल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, केवळ घोषणा देऊन चालणार नाही. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करत मी काय संकेत देणार लोकांनी ठरवलं आहे. कारण जनतेने संकेत दिल्यानंतर आता गदा आणि मशाल हातात घेऊन आपल्याला सांगलीत ना एक मर्द दिल्लीत पाठवायचे. असं म्हणत यावेळी चंद्रावर पाटील यांचे ठाकरे गटात प्रवेश होताच उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचे थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा सुटल्याचं चित्र आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सांगलीची जागा देण्याच्या हालचाली गतिमान होत असतानाच, चंद्रहार पाटील त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करतात उद्धव ठाकरेंकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र दुसरीकडे या उमेदवारीची घोषणा झाल्याने सांगली जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.