रुस्तम ए हिंद बैलगाडी शर्यतीत बकासूर व महिब्या ही बैलजोडी विजयी, लाखो शौकिनांनी अनुभवला थरार
Rustom e Hind bullock cart race : महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या (Chandrahar Patil Youth Foundation) माध्यमातून सांगल्याची भाळवणी येथे रुस्तम ए हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार लाखो शौकिनांनी अनुभवला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या शर्यतीत बकासूर आणि महिब्या (Bakasur and Mahibya) या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावत रुस्तम ए हिंद या किताबावर मोहर उमटवली. अतिशय अभूतपूर्व जल्लोषात या बैलगाडा शर्यती पार पडल्या. यात दोन लाखांहून अधिक बैलगाडा शर्यत शौकिनांनी हजरी लावली होती.
सांगलीच्या भाळवणी येथील बोलगाडी स्पर्धेत 7 बैलजोड्या ह्या अंतिम फेरीत पोहोलचल्य होत्या. त्यात सदाशिव कदम मास्तर रेठरे, संभाजी आबा काल यांचा हिंदकेसरी महिब्या आणि मोहितशेठ धुमाळ, नाथसाहेब प्रसन्न सुसगावकरांचा हिंदकेसरी बकासुराने बाजी मारली. त्यानंतर या बकासूर आणि महिब्या बैलजोडीला थार गाडी भेट म्हणून देण्यात आली. या विजयानंतर बैलगाडी शर्यतीच्या शौकिनांना एकच जल्लोष केला.
Breaking! शिवसेना पक्षनिधी, मालमत्ता प्रमुखांकडे सोपवा, सर्वोच्च न्यायालयात याचिका
भाळवणी खानापूर येथं बैलगाडी शर्यत पहाण्यासाठी मैदान गर्दीने फुलले होते. शर्यतीचा थरार आणि कोणती जोडी थार जीप पटकवणार याची उत्सुकता लागली होती. दुपारच्या कडक उन्हातही शर्यतीचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन डबल केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथ फौंडेशनच्या वतीन करण्यात आलं होते. स्पर्धेसाठी राज्यातून व परराज्यातून बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. सुमारे 10 एकर परिसरातील माळरानावर ही ऐतिहासिक स्पर्धा पार पडली.
शर्यतीला जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मान्यवरांनी भेट दिली. स्पर्धेत 27 गटात शर्यत घेण्यात आली. त्यातून उपांत्य सामन्यासाठी 32 बैलजोड्या पात्र ठरल्या. चिठ्ठी काढून सहा उपांत्य फेरीतील बैलगाड्या निश्चित केल्या. सायंकाळी उपांत्य फेरी सुरु झाली. रात्री उशिरा सात बैलजोड्यांची अंतिम फेरीतील चुरस पहायला मिळाली. स्पर्धेतील प्रथम विजेत्या बैलगाडी मालकास ‘थार’ जीप बक्षिस, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकास ट्रॅक्टर, चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी दुचाकी, सहाव्या क्रमांकासाठी ई बाईक दिली. तसेच इतरही अनेक बक्षिसे दिली. सहभागींना देखील मानाची गदा व गुलाल दिला.
स्पर्धेसाठी खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार अरुणअण्णा लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेषाधिकारी मंगेश चिवटे आदिसह कुस्ती व राजकीय क्षेत्रातीहल मान्यवर उपस्थित होते.