US Citizenship Stayed : अमेरिकेत (America) राहणाऱ्या भारतीयांना आज मोठा दिलासा मिळालाय. व्हिसावर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डची (Green card) वाट पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना आता अमेरिका सोडण्याची भीती राहिली नाही. कारण जन्मसिद्ध नागरिकत्व (Citizenship by birth) बंद करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशाला सिएटलमधील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
ठाकरे म्हणजे बोलाची कढी अन् बोलाचा भात; सीएसएमटीच्या शिवरायांच्या पुतळ्यावरून दरेकरांचा टोला
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी आणि अध्यक्षीय भाषणावेळी अनेक घोषणा केल्या होत्या. पहिल्याच दिवशी त्यांनी अनेक आदेशांवर स्वाक्षरी केली होती. मात्र, आता त्यांच्या या वेगाला ब्रेक लागणार असल्याचं दिसतं. कारण सिएटलच्या एका न्यायालयाने जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या त्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सिएटलमधील एका न्यायालयाने अनिश्चित काळासाठी ही स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
ट्रम्प प्रशासनाच्या आदेशावर टीका करताना सिएटल न्यायालयाने म्हटले आहे की, ट्रम्प संविधानाशी धोरणात्मक खेळ खेळण्यासाठी कायदेशीर नियमांना बायपास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, गुरुवारी सिएटलमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश कफेनर यांनी कठोर स्वरात ट्रम्प यांच्या आदेशावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, आपल्या राष्ट्रपतींसाठी कायद्याचे राज्य हे त्यांच्या धोरणात्मक उद्दिष्टांमध्ये केवळ एक अडथळा आहे. त्यांच्या मते, कायद्याचे राज्य ही अशी गोष्ट आहे जी राजकीय किंवा वैयक्तिक फायद्यासाठी टाळता येते किंवा दुर्लक्षित केली जाऊ शकते.
दिल्लीच्या निकालापूर्वी राहुल गांधी नॅरेटिव्ह सेट करतायत : CM फडणवीस यांचा आरोप
न्यायाधीश म्हणाले – संविधानात सुधारणा करावी लागेल
न्यायाधीश पुढे म्हणाले की, या न्यायालयात आणि माझ्या देखरेखीखाली कायद्याचे राज्य कायम राहील, कोणी काहीही केले तरी. संविधान ही अशी गोष्ट नाही ज्याच्या मदतीने सरकार धोरणात्मक खेळ खेळू शकेल. जर सरकारला जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा बदलायचा असेल तर सरकारला संविधानातच सुधारणा करावी लागेल, असं ते म्हणाले.
ट्रम्पच्या आदेशाचा भारतीयांवर काय परिणाम होईल?
२० जानेवारी रोजी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच, ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशानुसार अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या ज्या मुलांना आणि ज्यांचे पालक अमेरिकेचे कायमचे रहिवासी नाहीत अशा मुलांना अमेरिकन नागरिकत्व नाकारले जाते.