Video : अमेरिकेत आणखी एक विमान अपघात, इमारतींना आग; 6 जणांचा मृत्यू
Plane Crash In Philadelphia Video : अमेरिकेत विमान अपघाताची घटना ताजी असतानाच (Plane Crash) आणखी एका विमान अपघाताची घटना घडली आहे. फिलाडेल्फिया विमानतळावरून (Plane Crash in Philadelphia) उड्डाण घेतल्यानंतर लगेचच विमान क्रॅश झाले. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टनच्या विमानतळाजवळ विमान अपघात झाला होता. या अपघातात 67 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच हा दुसरा अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.
एएफपी आणि रॉयटर्स वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार एक विमान शॉपिंग मॉलजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. हे विमान नॉर्थ ईस्ट फिलाडेल्फिया विमानतळावरून निघाले होते. टेक ऑफ केल्यानंतर फक्त 30 सेकंदांनंतर क्रॅश झाले. यामुळे आसपासच्या काही इमारतींनाही आग लागली. फिलाडेल्फिया ऑफीस ऑफ इमर्जन्सी मॅनेजमेंटने सोशल मीडियावर या अपघाताची माहिती दिली.
Video : अमेरिकेत भीषण अपघात! हेलिकॉप्टर धडकेत विमान नदीत कोसळलं; 19 जणांचा मृत्यू
JUST IN: New video of the plane crash in Philadelphia. At least 6 people killed pic.twitter.com/zrX3jZcjoO
— BNO News (@BNONews) February 1, 2025
पेन्सिल्वेनियाचे गव्हर्नर जोश शपिरो यांनी सांगितले की घटना कशामुळे घडली याची सखोल चौकशी करण्यात येईल. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा प्रसंग टिपण्यात आला आहे. विमान इमारतीवर कसे आदळते आणि नंतर इमारतीला आग लागते हे या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
फिलाडेल्फिया फायर डिपार्टमेंट आणि स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. ज्या इमारतींचे नुकसान झाले तेथील रहिवाशांना काही काळ दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आले. गव्हर्नर जोश शेपिरो यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. विमान सुरक्षिततेचे नियम आता अधिक कठोर करण्यात येतील. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांतील हा दुसरा विमान अपघात आहे. वॉशिंग्टनमध्ये झालेला अपघात हा विमान सुरक्षा उपाययोजनांतील कमतरता स्पष्टपणे दाखवून देतो. आता या विमान अपघाताचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही अपघातांची खरी कारणे काय आहेत, यामध्ये कुणाची चूक आहे याची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतर मिळतील असे सांगण्यात आले.
आर्मी हेलिकॉप्टरला धडकलेल्या अमेरिकन एअरलाइन्समधील सर्व 64 जणांचा मृत्यू ? 28 मृतदेह सापडले