Protest Against Donald Trump-Elon Musk : संयुक्त राज्य अमेरिकेत शनिवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा (Donald Trump) राष्ट्रपती झाल्यानंतरचे हे पहिलेच मोठे आंदोलन होते. डोनाल्ड ट्रम्प सध्या ज्या पद्धतीने देशाचा कारभार करत आहेत. त्यांची जी काही धोरणे आहेत त्या विरोधात संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. अमेरिकेतील 50 राज्यांतील 1200 पेक्षा जास्त ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, एलन मस्क (Elon Musk) यांच्याविरोधात हँड्स ऑफ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दीडशेपेक्षा जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या. सिव्हील राइट्स ऑर्गनायजेशन, लेबर यूनियन, LGBTQ+ चे वकील, निवडणूक कार्यकर्त्यांसह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले. या आंदोलनात कुणाला अटक करण्यात आल्याची अद्याप माहिती नाही.
डोनाल्ड ट्रम्प पुतीनला झटका देणार; रशियाच्या तेलावर अतिरिक्त टॅरिफ लावणार? भारत, चीनला फटका बसणार
अमेरिकेतील मिडटाउन मॅनहॅटनपासून एंकोरेज, अलास्का यांसह अन्य राज्यांच्या राजधानीत हजारो लोक गोळा झाले होते. आंदोलकांच्या हातात मोठे फलक होते. फलक हातात घेऊन लोकांनी रॅली काढली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या धोरणांवर आंदोलकांनी संताप व्यक्त केला. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कारभार हाती घेताच अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. काही निर्णयांचे लोकांनी स्वागत केले आहे पण काही लोकांकडून या निर्णयाचा जोरदार विरोध केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांत मोठी कपात करण्यात आली होती. गृह, ऊर्जा, आरोग्य, कृषी, माजी सैनिक व्यवहार, मानवी सेवाअ अशा विभागातील कर्मचारी कपत करण्यात आली. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच ट्रम्प यांच्य सध्याच्या कारभारावर जोरदार टीका केली.
चीनचा ट्रम्पला झटका; अमेरिकेच्या वस्तूंवर 34 टक्के ‘टॅरिफ’ अमेरिकेचे शेअर बाजार कोसळला
डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत. त्याचाही निषेध करण्यात आला. एलन मस्क यांच्या नेतृत्वातील विभागाने काही निर्णय घेतले आहेत. सामाजिक सुरक्षा प्रशासन कार्यालये बंद करणे, स्थलांतरितांना निर्वासित करणे, ट्रान्सजेंडर संरक्षण, आरोग्य कार्यक्रमांसाठी निधी कमी करणे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांनी एकूण डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.