Download App

US on India-Pakistan Relations: अमेरिका करणार भारत-पाकिस्तानची मध्यस्थी, वाद सोडवण्यासाठी करणार प्रयत्न

  • Written By: Last Updated:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकालीन वाद सोडवण्यासाठी विधायक चर्चेला पाठिंबा देत असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला आहे. गुरुवारी (9 मार्च) यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कूटनीतिचे समर्थन करतो. आम्ही एक भागीदार आहोत म्हणून दोघांमध्ये संवाद व्हावा यासाठी प्रेयत्न करू.

‘त्या’ मुलांवर कारवाई नको, जे घडलं त्याकडे दुर्लक्ष करावं 

मात्र, भारत आणि पाकिस्तानला पहिल्या चर्चेचा निर्णय स्वतः घ्यावा लागेल, असे नेड प्राइस यांनी सांगितले. ते म्हणाले की, हे असे निर्णय आहेत जे भारत आणि पाकिस्तानला स्वतःच घ्यावे लागतील. ते अमेरिका ठरवू शकत नाही.

पाकिस्तान एससीओच्या बैठकीत सहभागी होणार नाही

किंबहुना, पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेपलीकडील दहशतवादाच्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमधील संबंध अनेक वर्षांपासून खराब आहेत. इस्लामाबाद देखील भारताच्या पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी कलम 370 पुनर्स्थापित करण्याची मागणी करत आहे. 10-12 मार्च रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या मुख्य न्यायमूर्तींच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय पाकिस्तानने गुरुवारी घेतला.

फार्महाऊसवर सतीश कौशिक नेमके कधी पोहचले? तिथं त्यांच्यासोबत काय झालं?; पोलिसांकडून तपास सुरू

काही सदस्य या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहतील

SCO च्या सक्रिय सदस्यांपैकी एक म्हणून, पाकिस्तान नियमितपणे सर्व SCO क्रियाकलापांमध्ये भाग घेतो आणि योगदान देतो, असे परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी एका निवेदनात म्हटले आहे. आता पाकिस्तान हा एकमेव देश आहे जो भारताने आयोजित केलेल्या SCO चीफ जस्टिसची बैठकीला उपस्थित राहणार नाही. नवीन सदस्य इराणसह इतर सर्व सदस्य या बैठकीला वैयक्तिकरित्या उपस्थित राहतील.

Tags

follow us