American Federal Appeals Court on Donald Trump for Tarrif on Various Contry : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. कर लावण्याची अंतिम मुदत बुधवारी 27 ऑगस्टला संपली. आता भारतावर एकूण 50 टक्के कर लादण्यात आला आहे. दरम्यान ट्रम्प यांचे हे धोरण जगाला नुकसानकारक ठरत आहे. त्यात आता अमेरिकन फेडरल अपील कोर्टाने फटकारलं आहे.
अमेरिकन फेडरल अपील कोर्टाने ट्रम्प यांना फटकारलं…
अमेरिकन फेडरल अपील कोर्टाने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी जगभरातील विविध देशांवर लावलेल्या ट्ररिफवरून फटकारले आहे. मात्र त्यांनी टॅरिफ थांबवलेला नाही. तसेच प्रशासनाला वरच्या कोर्टात जाण्यासाठी वेळ दिला आहे.
गृहमंत्री अमित शाह मुंबईत; विनोद तावडेंसोबत मराठा आरक्षणावर चर्चा, तोडगा निघणार?
कोर्टाने या सुनावणीमध्ये म्हटले आहे की, 1977 च्या इंटरनॅशनल इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्टचा गैरवापर केला आहे. पण कॉंग्रेस राष्ट्रपतींना असा प्रकारे अमर्याद टॅरिफ लावण्याचा अधिकार देत नाही. दुसरीकडे काही न्यायाधीशांनी या निर्णयाच्या विरूद्ध आणि ट्रम्प यांच्या बाजूने या निर्णयाला विरोद दर्शवला आहे. ते म्हणाले की, ट्रम्प यांचा टॅरिफ लावण्याचा अधिकार असंविधानिक नाही.
कुणाला आनंदी-आनंद तर कुणासाठी संमिश्र कसा आहे? सर्व राशींसाठी आजचा दिवस जाणून घ्या…
यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, टॅरिफ लावणे चुकीचे असल्याचे म्हणणारा कोर्टाचा हा निर्णय अमेरिकेला नुकसानकारक ठरेल. हा टॅरिफ काढला तर देश अर्थिक बाबतीत कमजोर होईल. आता आपण शत्रु किंवा मित्र राष्ट्रांच्या टॅरिफला सहन करणार नाही. हा निर्णय अमेरिकेला विनासाकडे घेऊन जाईल. असं म्हणत ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला. तसेच टॅरिफचे समर्थन केले.