कुणाला आनंदी-आनंद तर कुणासाठी संमिश्र कसा आहे? सर्व राशींसाठी आजचा दिवस जाणून घ्या…

कुणाला आनंदी-आनंद तर कुणासाठी संमिश्र कसा आहे? सर्व राशींसाठी आजचा दिवस जाणून घ्या…

Todays Horoscope 30 August 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Video : टपऱ्या, हॉटेल्स बंद.., लासलगाव ग्रामस्थांनी मुंबईत आंदोलकांसाठी ट्रकने आणल्या भाकरी

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आज जोडीदारासाठी एखादं काम करणं महत्त्वाचं असेल. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच तुमच्या कौटुंबिक समस्या आज एकत्र येत दूर करण्याची गरज आहे. तसेच आज तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवाल. जेणेकरून तुमचं नातं आणखी घट्ट होईल. मात्र आज एखाद्या गोष्टीवरून तुम्ही अस्वस्थ असाल.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन पेटणार ?, मुंबईतील सर्व पोलिसांच्या रजा तातडीने रद्द

वृषभ – या राशीच्या लोकांना आज नव्या संधी मिळतील. ज्यामध्ये काम करायला तुम्हाला आनंद मिळेल. तसेच तुम्ही या जबाबदाऱ्या कार्यक्षमपणे पार पाडाल. तसेच कोणत्याही अटीवर आज कष्ट करण्यामध्ये माघार घेऊ नका. तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे. मात्र अनावश्यक गोष्टींमध्ये अडकणं आज टाळा. आज घर खरेदीचे योग देखील आहेत.

Asia Cup Hockey 2025 : आशिया कपमध्ये भारताची शानदार सुरुवात, चीनचा 4-3 ने पराभव

मिथुन – या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस वेळेत कामं उरकण्याचा आहे. तसेच तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. जेणेकरून तुमचा मानसन्मान कायम राहील. तसेच यातून तुम्ही तुमच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच आजच्या दिवशी तुमची गुप्त माहिती कुणालाही सांगणं टाळा. जेणेकरून तुम्ही अडचणीत सापडणार नाही.

महाराष्ट्रात पावसाचा कहर; मराठवाड्यात नांदेडमध्ये हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

कर्क – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी गरजेचा आहे. त्याचबरोबर तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावरही लक्ष द्या. तसेच कागदपत्र आणि कचेरीच्या कामांना पूर्ण केल्यास योग्य ठरेल. जेणेकरून तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये किंवा समस्यांमध्ये अडकणार नाहीत. आज कोणत्याही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.

…हा मराठ्यांनी मुंबई सोडून जाण्यासाठीचा डाव; मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक

सिंह – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानता बाळगण्याचा आहे. तसेच आजचा दिवस काहीसा खर्चिक देखील असणार आहे. तर दुसरीकडे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. त्यांना आनंद देऊ शकाल. तसेच आज एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची ही शक्यता आहे. मात्र आजचा दिवस घरातील महत्त्वाच्या प्रलंबित कामासाठी देणही तेवढेच महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकार इंग्रजांपेक्षा बेकार, आम्ही आरक्षण घेणारच; मनोज जरांगे आक्रमक

कन्या – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस म्हणजे कामातील बदल टाळावा. तसेच घरातील कौटुंबिक समस्यांवर चर्चा करणे गरजेचे आहे. आज या राशीच्या लोकांचं मन काही गोष्टींसाठी विचलित होऊ शकतं. तसेच घरातील एखाद्या व्यक्तीचे गुप्त माहिती समोर येऊ शकते. घरातील विवाह पार पाडण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करू शकाल. ज्यातून तुम्ही जबाबदारीतून मुक्त व्हाल.

शेख महंमद मंदीर समिती आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला वाद अजित पवार यांच्यासमोर उफाळला..

तुळ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संपत्तीच्या बाबतीत समस्या निर्माण करणारा ठरू शकतो. ज्यातून तुमची एखादी देईल होता होता राहू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या डील विचार करून करण्यात यावेत. तसेच आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आपत्यांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या करिअरच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या घरातील गुप्त माहिती कुणालाही शेअर करण्यापासून आज सावधानता बाळगा. अन्यथा त्यातून वादविवाद होण्याची शक्यता दाट आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरुच राहणार, मिळाली एक दिवसाची मुदतवाढ

वृश्चिक – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीशी चल बिचल निर्माण करणारी आहे. तसेच परदेशात जाण्याच्या योजना देखील आज तुम्ही आखू शकता. तसेच आज तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून काही अडचणी निर्माण होणार नाहीत. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन वाहन घेण्याचे देखील आज योग आहेत. तसेच प्रेमाने तुम्ही तुमच्या समस्या सोडवल्यास काही जुन्या समस्या आज कायमच्या सुटण्याची शक्यता आहे.

धनु – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा टेन्शन घेण्यासारखा आहे. मात्र आज तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमची प्रशंसा केली जाईल. याचा आनंद तुमच्या पूर्ण दिवसावर परिणाम करेल. आज तुम्हाला तुमच्या आईकडून एखादी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये तुमच्या भावंडांची तुम्हाला साथ मिळेल. आज तुम्ही जे काही काम कराल. त्यामध्ये यश नक्की आहे.

मकर – या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस आनंदी आनंद आहे. मात्र आज तुम्ही कोणत्याही राजकीय क्षेत्राचा हिस्सा बनू नका. जेणेकरून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आज एखाद्या तुमच्या आवडत्या वस्तूच्या हरवण्याच्या किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या वस्तूंची आज देखभाल योग्य करा. आज तुमचं प्रेमाचं आणि वैवाहिक आयुष्य आणखी घट्ट होण्याचे होण्याचा दिवस आहे .

कुंभ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण तुमच्या आयुष्यात सध्या सुरू असलेल्या चढउतारांमुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे देखील तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे. आजचा दिवस तुमचा कामांमध्ये व्यस्त असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस काहीसा टेन्शन देणारा देखील ठरू शकतो. आजच्या दिवशी वाहनांपासून सावधानता बाळगा.

मीन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असेल. या राशीचे लोक आज त्यांच्या जोडीदाराबरोबर महत्त्वाचा वेळ घालू शकतात. तसेच आजचा दिवस तुमच्या अपत्याच्या करिअरवर लक्ष देण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे करणारा ठरू शकतो. तसेच तुम्हाला आज सरकारी योजनांमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube