शेख महंमद मंदीर समिती आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला वाद अजित पवार यांच्यासमोर उफाळला..

शेख महंमद मंदीर समिती आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला वाद अजित पवार यांच्यासमोर उफाळला..

Ajit Pawar : संत शेख महंमद महाराज मंदीर जिर्णोद्धार वरून संत शेख महंमद मंदिर समिती व संत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला वाद थेट अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर उफाळून आला. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने श्रीगोंद्यात आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्या पूर्वी श्रीगोंद्याचे आराध्य दैवत संत शेख महंमद महाराज मंदीरात (Sheikh Mohammed Maharaj Mandir) जाऊन दर्शन घेत संत शेख महंमद महाराज समाधीस्थळावर चादर चढवली पण चढवलेली चादर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम शेलार यांचे समर्थकाने काढल्याने संतापलेल्या अजित पवार यांनी पोलिसांना त्या कार्यकर्त्याचे नाव लिहून घेण्याच्या सुचना देत घटनेचे भाषणातून वाभाडे काढले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजीत पवार हे संत शेख महंमद महाराज मंदीरात दर्शनासाठी गेले. संत शेख महंमद महाराजांचे वशंजांनी समाधीस्थळावर चढविण्यासाठी लागणारी चादर अजीत पवारांच्या हातात दिली. महाराजांच्या समाधीस्थळावर चादर चढविली मात्र पवार यांना दर्शन घेण्यापूर्वीच चढवलेली चादर राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचे समर्थक असलेल्या उत्साही कार्यकर्त्याने समाधीवरून काढली.

या घटनेने अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी काढलेली चादर पुन्हा टाकण्यास सांगितले आणि दर्शन घेतले. शेतकरी मेळाव्याच्या भाषणात या घटनेचा उल्लेख काढत बारामतीत असे घडले असते तर वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती. माझ्या समोर असे प्रकार घडत असेल तर पाठीमागे काय घडत असेल असे खडे बोल सुद्धा सुनावले.

“मनोज जरांगे शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब”, भाजप आमदार संजय केनेकरांचा हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube