Asia Cup Hockey 2025 : आशिया कपमध्ये भारताची शानदार सुरुवात, चीनचा 4-3 ने पराभव

Asia Cup Hockey 2025 : हॉकी आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup Hockey 2025) भारताने शानदार सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने चीनचा 4-3 ने (India vs China) पराभव केला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीतसह जुगराज सिंग भारतासाठी या सामन्यात स्टार ठरले आहे. सामन्या पहिल्या क्वार्टरमध्ये चीनने दमदार खेळ दाखवत आघाडी घेतली होती मात्र भारताने दोन मिनिटांमध्ये दोन गोल करत हाफ टाइमपर्यंत सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली होती.
भारताकडून कर्णधार हरमनप्रीतने 20 व्या, 33 व्या आणि 47 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर जुगराज सिंगने 18 व्या मिनिटाला गोल केला. चीनकडून डू शिहाओ (12व्या), चेन बेनहाई (35व्या मिनिटाला) आणि गाओ जिशेंग (42व्या मिनिटाला) गोल केले. भारताला आता रविवारी जपानविरुद्ध खेळायचे आहे. तर दुसरीकडे पूल अ च्या पहिल्या सामन्यात जपानने कझाकिस्तानचा 7-0 असा पराभव केला.
𝗚𝗼𝗮𝗹𝘀 𝗚𝗮𝗹𝗼𝗿𝗲! 🤩
India and China served up a mouth-watering match to wrap up the opening day’s proceedings at the Hero Asia Cup, Rajgir, Bihar, 2025.
🇮🇳 4-3 🇨🇳#HockeyIndia #IndiaKaGame #HumSeHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/rh9TRFL2WG
— Hockey India (@TheHockeyIndia) August 29, 2025
पुरुष आशिया कप हॉकी शुक्रवारपासून बिहारमधील राजगीर येथे आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा 29 ऑगस्टपासून राजगीर येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू झाली असून 7 सप्टेंबर 2025 रोजी संपणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 2026 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन हॉकी विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. आतापर्यंत हॉकी आशिया कपच्या 11 आवृत्त्या झाल्या आहेत, ज्यामध्ये कोरियाने पाच वेळा, भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी तीन वेळा विजय मिळवला आहे.
सरकार इंग्रजांपेक्षा बेकार, आम्ही आरक्षण घेणारच; मनोज जरांगे आक्रमक
आशिया कप पुरुष हॉकीच्या बाराव्या आवृत्तीत भारत, जपान, चीन, कझाकिस्तान, मलेशिया, कोरिया, बांगलादेश आणि चिनी तैपेई या आठ अव्वल आशियाई देशांचा सहभाग आहे. या स्पर्धेत यजमान भारताला जपान, चीन आणि कझाकस्तानसह पूल अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना चीन विरुद्ध होता. त्यानंतर, ते त्यांचा शेवटचा पूल सामना 31 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध आणि 1 सप्टेंबर रोजी कझाकस्तान विरुद्ध खेळतील. पूल अ मध्ये, भारत-चीन सामन्याव्यतिरिक्त, पहिल्या दिवशी जपान आणि कझाकस्तान देखील भिडतील. तर पूल ब मध्ये मलेशिया, कोरिया, बांगलादेश आणि चायनीज तैपेई यांचा समावेश आहे.