Video : टपऱ्या, हॉटेल्स बंद.., लासलगाव ग्रामस्थांनी मुंबईत आंदोलकांसाठी ट्रकने आणल्या भाकरी

Video : टपऱ्या, हॉटेल्स बंद.., लासलगाव ग्रामस्थांनी मुंबईत आंदोलकांसाठी ट्रकने आणल्या भाकरी

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत पोहचले आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनस्थळाजवळ असणाऱ्या काही खाऊ गल्ल्या बंद असल्याने आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलकांसाठी ट्रकने नाशिकच्या (Nashik) लासलगाव (Lasalgaon) ग्रामस्थांनी भाकरी आणल्या आहे.

जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी मुंबईत आज लाखो लोक आले आहेत. त्यामुळे आम्ही येवला, लासलगाव या मतदारसंघात एक भाकर समाजासाठी ही संकल्पना राबवून प्रत्येक घरातून आंदोलकांसाठी भाकरी घेऊन आम्ही आझाद मैदानात आलो असल्याची माहिती लेट्सअप मराठीशी बोलताना मराठा आंदोलकाने दिली. समाज बांधवांसाठी आम्ही तीन ते चार गाड्या भाकरी घेऊन आले आहे असं देखील यावेळी ते म्हणाले. सरकारने आंदोलनस्थळाजवळ असणारे दुकाने बंद केले आहे मात्र सरकार मराठ्यांना बंद करु शकणार नाही. असेही यावेळी ते म्हणाले.

भाकरीची जबाबदारी नाशिककरांना दिली

मनोज जरांगे पाटील यांनी लासलगाव येथे मोठी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी समाजासाठी भाकरीची जबाबदारी नाशिककरांना दिली होती. या सभेनंतर आम्ही जवळपास 46 गावात बैठक घेत भाकरीचे नियोजन केले आणि आज सकाळी प्रत्येक गावातून भाकरी जमा करुन 11 वाजता मुंबईच्या दिशेने आम्ही निघालो अशी देखील माहिती लेट्सअप मराठीशी बोलताना मराठा आंदोलकांनी दिली. तसेच सरकारने आंदोलनस्थळाजवळ खाऊ गल्ली, हॉटेल्स आणि चहाच्या टपऱ्या बंद ठेवले मात्र दारुच्या दुकाने सुरु ठेवल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच जेव्हापर्यंत आरक्षण मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही मुंबई सोडणार नसल्याची ठाम भूमिका लेट्सअप मराठीशी बोलताना मराठा आंदोलकांनी घेतली.

Asia Cup Hockey 2025 : आशिया कपमध्ये भारताची शानदार सुरुवात, चीनचा 4-3 ने पराभव

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आमचे पोरं मुंबईत आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल्स बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. मग आम्ही पण तुमच्या सभा आमच्या इथं आल्यावर पाईपलाईनीतून त्या दिवशी पाणी बंद करणार असा इशारा सरकारला दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube