Download App

अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध कायम, तरीही ट्रम्पकडून हिरे करार मंजूर! जाणून घ्या कारण

America’s big decision sanctions on Russia remain yet Trump approves diamond deal: अमेरिका आणि रशियामधील संबंध तणावपूर्ण आहेत तर भारत आणि अमेरिकेचे संबंध चढउतारांनी भरलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज आहेत. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियावर लादलेल्या काही निर्बंधांमध्ये अमेरिकेने सूट (Diamond Deal) दिली आहे. ट्रम्प यांनी काही विशेष हिऱ्यांच्या आयाती रशियावर निर्बंध असूनही परवानगी दिली आहे. अमेरिकेने यासाठी 1 सप्टेंबर 2026 पर्यंत सूट दिली आहे.

महायुतीत मिठाचा खडा! श्रीगोंद्यात अजितदादांच्या मेळाव्याआधीच आ. पाचपुते आक्रमक; जगताप-नागवडेंना घेरलं

अमेरिकेच्या परराष्ट्र मालमत्ता नियंत्रण कार्यालयाकडून (OFAC) माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार 1 सप्टेंबर 2026 पर्यंत हिरे आयात (Diamond Deal) करता येतीत, परंतु यासाठी काही अटी देखील घातल्या आहेत. जर हिऱ्याचे वजन 1 कॅरेटपेक्षा जास्त असेल आणि हिरा 1 मार्च 2024 पूर्वी रशियाच्या बाहेर असेल तरच हिरा आयात करता येईल. दुसरीकडे, जर हिऱ्याचे वजन 0.5 कॅरेटपेक्षा जास्त असेल आणि तो 1 सप्टेंबर 2024 पूर्वी रशियाच्या बाहेर असेल तर असा हिरा देखील आयात (Diamond Deal) करता येणार आहे.

KBC 17 वर राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जल्लोष! महिला आइस हॉकी संघाचा अमिताभ बच्चन यांनी केला सन्मान

रशियामुळे ट्रम्प भारतावर नाराज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो याबद्दल त्यांना अडचण आहे. परंतू चीन देखील रशियाकडून तेल खरेदी करतो आणि आता अमेरिका स्वतः रशियाला हिऱ्यांवर सूट (Diamond Deal) देत आहे. ट्रम्प यांनी भारतावर आरोप केला होता की, भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेनमधील युद्धाला फंडिंग देत ​​आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण होण्यामध्ये या आरोपांचाही वाटा आहे.

महाराष्ट्राचा ‘गुंड्याभाऊ’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं 95 व्या वर्षी निधन

टॅरिफमुळे अमेरिकेलाही नुकसान

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अमेरिकेलाही मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. भारत आणि इतर देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे महागाई वाढू शकते, ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था 0.4-0.5 टक्क्यांनी घसरू शकते. अमेरिकेने भारतावर लादलेला 25 टक्के अतिरिक्त कर बुधवारपासून लागू झाला आहे. यासह, भारतीय निर्यातीवरील अमेरिकेचा कर 50 टक्के झाला आहे.

follow us