महाराष्ट्राचा ‘गुंड्याभाऊ’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं 95 व्या वर्षी निधन

  • Written By: Published:
महाराष्ट्राचा ‘गुंड्याभाऊ’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं 95 व्या वर्षी निधन

Veteran Marathi Actor Bal Karve Passed Away : कालाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली असून, ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि नाटकार बाळ कर्वे यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. बाळ कर्वे यांची कन्या स्वाती यांनी याबाबत माहिती दिली आहे. कर्वे यांनी दूरदर्शनवरील चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेत केलेली गुंड्याभाऊची भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती. ही मालिका १९७९ साली आली होती. तीन दिवसांपूर्वी कर्वे यांचा 95 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. बन्या बापू चित्रपटात बाळ कर्वे यांनी साकारलेली बापूची भूमिकादेखील विशेष गाजली होती. कर्वे यांना ‘आई रिटायर होते’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला होता. तसेच गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

बॉलिवूडमध्ये खळबळ! शाहरुख खान, दीपिका पदुकोण विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

बाळ कर्वे यांचा जीवनप्रवास

बाळ कर्वे यांचा जन्म २५ ऑगस्ट, १९३० रोजी झाला. कर्वे कुटंबीय पुण्याचे. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झाले. बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘बाळ’ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाले. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. त्यांनी बत्तीस वर्षे नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत पार्ल्यात एका नातेवाइकाकडे राहात.. त्याच ‌इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. ते रंगभूमीशी संबंधित होते. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ अशी छोटीशी संस्था स्थापन केलीआणि त्तिच्यासाठी ते बालनाट्ये बसवू लागले.

गुंड्याभाऊ हे बाळ कर्वेंनी साकारलेलं पात्र विशेष गाजलं

‘चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही भारतातील पहिली टीव्ही मालिका होती. तोपर्यंत टीव्हीवर मालिकांचा सिलसिला सुरू झालेला नव्हता. याकूब सईद आणि विजया जोगळेकर यांची ती संकल्पना होती. गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी शरद तळवलकरांचे नाव सुचविले होते, पण ते तेव्हा चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी कर्व्यांचे नाव सुचविले आणि अपघातानेच वाट्याला आलेल्या त्या भूमिकेने बाळ कर्वे महाराष्ट्रातल्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचले. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेतील बाळ कर्वे यांनी साकारलेला ‘गंगोबा तात्या’ गाजला. खलनायक असलेल्या या पात्राच्या तोंडी असलेला ‘काय’ हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला. वीरेंद्र प्रधान याच्या आग्रहाखातर ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या एकाच भागात त्यांनी ‘गणेश शास्त्री’ ही वैद्यराजांची भूमिका रंगविली आणि त्या छोट्याशा भूमिकेतही ते छाप पाडून गेले.

नाटके

  • अजब न्याय वर्तुळाचा
  • आई रिटायर होते (या नाटकातील भूमिकेसाठी बाळ कर्वे यांना राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला.)
  • आम्ही लटिकेना बोलू
  • कुसुम मनोहर लेले
  • तांदुळ निवडता निवडता
  • बॅरिस्टर (बदली कलाकार)
  • मनोमनी
  • रथचक्र
  • लोभ नसावा ही विनंती (राज्य नाट्य स्पर्धेसाठीचे नाटक)
  • सूर्याची पिल्ले
  • शांतता कोर्ट चालू आहे (बदली कलाकार)
  • संध्याछाया (पहिले व्यावसायिक नाटक)

Mrunal Thakur : बॉलीवूडच नाही तर साऊथमध्येही मराठमोळ्या मृणालचा बोलबाला, ‘या’ चित्रपटात दाखवणार अभिनयाची जादू

चित्रपट

  • गोडी गुलाबी (१९९१)
  • चटक चांदणी (१९८२)
  • चांदोबा चांदोबा भागलास का
  • जैत रे जैत
  • बन्याबापू
  • लपंडाव (१९९३)
  • सुंदरा सातारकर

दूरदर्शनवरील मालिकाही गाजल्या

  • उंच माझा झोका
  • प्रपंच
  • महाश्वेता
  • राधा ही बावरी
  • वहिनीसाहेब
  • स्वामी
  • चिमणराव गुंड्याभाऊ

Video : पार्थ पवार अन् जॅकलिनने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; दानपेटीत टाकण्यासाठी पैसेही दिले

प्रीतीचं झुळझुळ पाणी.. आजही लोकप्रिय

बाळ कर्वे यांनी दहा ते पंधरा मराठी चित्रपट केले. ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांची अगदी लहान भूमिका होती. ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ हे त्यांचे काही चित्रपट. ‘बन्याबापू’ या चित्रपटात ते चक्क नायिकेबरोबर बागेत फिरताना आणि गाणे म्हणताना पडद्यावर दिसतात. सरला येवलेकर त्यांची नायिका होती. त्या दोघांवर चित्रित झालेले ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. सई परांजपे यांचा ‘कथा’ हा त्यांनी केलेला एकमात्र हिंदी चित्रपट. हिंदीत ते फारसे रमले नाहीत.
दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेतील त्यांनी साकार केलेला ‘गंगोबा तात्या’ गाजला. खलनायक असलेल्या या पात्राच्या तोंडी असलेला ‘काय’ हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला. ‘महाश्वेता’ या मालिकेतही ते होते. ‘प्रपंच’, ‘वहिनीसाहेब’ तर अलीकडच्या ‘राधा ही बावरी’ आणि ‘उंच माझा झोका’ या मालिकेतूनही कर्वे यांनी अभिनय केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या