Ashish Mishra : लखीमपूर खेरी प्रकरणी सर्वोच्च न्यालयाकडून आशिष मिश्राला जामीन, मात्र घातल्या ‘या’ अटी

लखीमपूर : लखीमपूर खेरी प्रकरणातील (Lakhimpur Kheri) आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra Bail) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या आशिषला ८ आठवड्यांसाठी सोडण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु या अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होणार, आशिष मिश्रा याला सुटकेच्या आठवड्याभरात उत्तर प्रदेश आणि दिल्ली सोडावे लागणार आहे. १४ मार्च […]

_LetsUpp (13)

Ashish Mishra Bail

लखीमपूर : लखीमपूर खेरी प्रकरणातील (Lakhimpur Kheri) आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra Bail) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या आशिषला ८ आठवड्यांसाठी सोडण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु या अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होणार, आशिष मिश्रा याला सुटकेच्या आठवड्याभरात उत्तर प्रदेश आणि दिल्ली सोडावे लागणार आहे.

१४ मार्च रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्या दिवशी आज दिलेल्या आदेशाचा आढावा घेतला जाणार आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने हत्येचा आरोप असलेल्या ४ शेतकऱ्यांना अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश दिला आहे. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाहन चालविल्याची घटना घडली होती.

काय आहे प्रकरण- गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी, अजय मिश्रा याच्या मालकीच्या थारसह तीन एसयूव्हीचा ताफा लखीमपूर खेरी येथे निदर्शक शेतकऱ्यांच्या गटावर धडकला. यात चार शेतकरी आणि एक पत्रकार ठार तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात भाजपचे दोन नेते आणि थार वाहनाचा चालक देखील ठार झाला होता. या घटनेप्रकरणी एसआयटीने आशिष मिश्रासह १३ जणांना अटक केली होती. ३ जानेवारी रोजी एसआयटीने आशिष मिश्रा आणि त्यांचे काका वीरेंद्र शुक्ला यांच्यासह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी मिश्रा याला जामीन मंजूर केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने एप्रिल २०२२ मध्ये उच्च न्यायालयाने तो रद्द केला.

Exit mobile version