Download App

ऑस्ट्रेलियन महिला खासदाराने संसदेतच केला लैंगिक शोषणाचा आरोप

Austrailia :  संसद ही प्रत्येत देशाची गरिमा असते. या ठिकाणी देशाच्या हिताचे निर्णय घेतले जातात. लोक आपल्या प्रतिनिधींची निवड करुन याठिकाणी पाठवतात. परंतु ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये एक लाज आणणारी घटना घडली आहे. एका महिल्या खासदाराचे अश्रू मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. खासदार लिडिया थोर्पे यांनी रडत-रडत भर संसदेमध्ये गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी थेट लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगभरात या घटनेविषयीची चर्चा सुरु आहे.

MNS Vs NCP : राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री

ऑस्ट्रेलियाचा खासदार लीडिया थोर्प यांनी आरोप लावला की, संसदेमध्ये त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्या म्हणाल्या की, ही इमारत महिलांना काम करण्यासाठी सेफ नाही आहे. हे सांगताना त्यांना रडू कोसळले. त्या पुढे म्हणाल्या की, त्यांच्यावर वाईट शब्दामध्ये टिप्पणी करण्यात आली. एका जिन्याच्या जवळ त्यांना घेरण्यात आले व त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला. थोर्पे यांनी रुढीवादी डेविड वैनच्या विरुद्ध हे आरोप लावले आहेत. वैन यांनी आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहे. वैन यांचे म्हणणे आहे की, या आरोपांमुळे ते पूर्णपणे कोलमडून गेले असून फार त्रासात आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे वैन यांनी लोकल मीडियाला सांगितले आहे. पण यानंतर लिबरल पार्टीने वैन यांना सस्पेंड केले.

Nitesh Rane on Sanjay Raut : …म्हणून मी पातळी सोडून बोलतो; राणेंनी सांगितली राऊतांविरोधातील युद्धनीती

थोर्प पुढे म्हणाल्या की, प्रत्येकासाठी लैंगिक शोषणाचा अर्थ वेगवेगळा आहे. माझ्यासोबत जे झाले ते मी सांगते. माझ्यासोबत जबरदस्ती करण्यात आली. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला. मी ऑफिसच्या गेटबाहेर पडायला देखील घाबरत होते. आधी मी दरवाजा उघडून बाहेर कुणी आहे की नाही हे पहायचे आणि मगच बाहेर पडायचे. मी इतकी घाबरले होते की जेव्हा मी इमारतीच्या आतमध्ये जात होते तेव्हा कुणाला तरी सोबत घेऊन जात होते. मला माहित आहे की, माझ्यासारख्या अजूनही काही पीडिता आहेत पण त्या कधी करिअरमुळे समोर आल्या नाही.

Tags

follow us