Download App

बग्राम एअरबेस परत करा नाहीतर… ट्रम्प यांची तालिबानला उघड धमकी

Donald Trump On Afghanistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बग्राम हवाई तळ परत केला नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागणार

  • Written By: Last Updated:

Donald Trump On Afghanistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बग्राम हवाई तळ परत केला नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागणार असा इशारा तालिबानला दिला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशलसाईट वर म्हटले आहे की, जर अफगाणिस्तानने बग्राम हवाई तळ बांधणाऱ्या लोकांना, म्हणजेच अमेरिकेला परत केला नाही, तर खूप वाईट गोष्टी घडणार आहेत.

तर दुसरीकडे दोन दिवसापूर्वी त्यांनी म्हटले होते की, बग्राम हवाई तळ सोडणे ही बायडेन प्रशासनाची मोठी चूक होती आणि ती दुरुस्त केली जाईल. त्यामुळे आता बग्राम हवाई तळावर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच माध्यमांशी बोलताना  बग्राम हवाई तळ (Bagram Air Base) चीनच्या जवळ आहे आणि अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे, म्हणून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात परत येईल असा इशारा देखील त्यांनी तालिबानला दिला होता.

तर दुसरीकडे तालिबान त्यांच्या देशात कधीही त्यांच्या देशात परदेशी लष्करी उपस्थिती स्वीकारणार नाही. अफगाणिस्तानच्या असं सरकारी रेडिओ आणि टेलिव्हिजन (RTA) ने माहिती दिली आहे. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ राजनयिक जलाली म्हणाले की, त्यांच्या संपूर्ण इतिहासात, अफगाण लोकांनी कधीही त्यांच्या भूमीवर परदेशी सैन्याची उपस्थिती स्वीकारली नाही. अफगाणिस्तान आणि अमेरिकेने परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित आर्थिक आणि राजकीय संबंधांवर सहकार्य करणे आवश्यक आहे.

मोदी राजीनामा देणार अन् फडणवीस पंतप्रधान होणार; हर्षवर्धन सपकाळांचा दावा

ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर बग्राम हवाई तळावर तालिबान सरकारचे नियंत्रण आहे.  जर बग्राम एअरबेस पुन्हा ताब्यात घेतला गेला तर अंदाजे 10,000 सैन्यांची आवश्यकता असेल असं एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांने सांगितले आहे.

follow us