India Pakistan War : भारताने बुधवारी रात्री थेट पाकिस्तानात एअर स्ट्राइक करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईने पाकिस्तान तर हादरला आहेच पण आता बांग्लादेशही पुरता घाबरला आहे. बॉर्डरवरील तणाव आणि भारताची आक्रमक कारवाई पाहता बांग्लादेशने वायूसेनेला अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. बांग्लादेशची नजर आता चीनच्या J-10C मल्टीरोल फायटर जेटवर आहे.
बांग्लादेशची फायटर जेट सिस्टीम जुनी झाली आहे. सिस्टीम अपग्रेड करण्याचा विचार बऱ्याच दिवसांपासून केला जात होता. परंतु, भारताच्या पाकिस्तानवरील ऑपरेशन सिंधूनंतर ही प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे. रिपोर्टनुसार बांग्लादेश एअरफोर्स सुरुवातीच्या टप्प्यात 16 जे 10 सीई लढाऊ विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. विगरस ड्रॅगन नावाने ओळखले जाणारे हे चिनी बनावटीचे विमान 4.5 जनरेशनचे आहे. अमेरिकेच्या एफ 16 फायटर जेट्सच्या तंत्रज्ञानाचा सामना करण्यास सक्षम आहे. एअर टू एअर आणि ग्राउंड अटॅक करण्यात ही विमाने प्रभावी आहेत.
मोठी बातमी, पाकिस्तानी एअर डिफेन्स उद्ध्वस्त, भारताचा थेट लाहोरवर ड्रोन हल्ला
बांग्लादेश चीनकडून हत्यारे खरेदी करणारा दुसरा मोठा खरेदीदार देश आहे. बांग्लादेशचा हा निर्णय क्षेत्रीय संतुलन बिघडवू शकतो असे काही तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे भारत आणि बांग्लादेश यांच्या संबंधात आणखी तणाव निर्माण होऊ शकतो. बांग्लादेशचा चीनकडील झुकाव आगामी काळात भारतासाठी अनेक अडचणी निर्माण करू शकतो.
बांग्लादेशच्या वायूसेनेकडे सध्या MiG-29, F-7, J-7 यांसारखी लढाऊ विमाने आहेत. या विमानांची क्षमता मर्यादीत आहे. ट्रेनिंग आणि हलक्या स्वरुपाच्या हल्ल्यांसाठी K-8, Yak-130 यांसारख्या विमानांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत जर बांग्लादेशने चीनकडून J-10C विमाने खरेदी केली तर बांग्लादेशच्या वायूसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. परंतु, बांग्लादेशचा सध्याची आर्थिक स्थिती पाहता बांग्लादेश ठराविक प्रमाणातच ही विमाने खरेदी करू शकतो.
मसूद अजहर भावालाही गमावणार, ऑपरेशन सिंदूरमध्ये कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रऊफ गंभीर जखमी