Bangladesh Election Results 2026: हिंसेने पोळलेल्या बांगलादेशमध्ये (Bangladesh) आता आंतरिम सरकार जावून जनतेने निवडलेले सरकार येणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (BNP) ला जनतेने स्पष्ट बहुमत दिलंय. तिनशेपैकी 209 जागा बीएनपीने जिंकल्यात. तर जमात पक्ष अवघ्या 68 जागाच जिंकू शकला आहे. त्यामुळे तब्बल वीस वर्षानंतर बीएनपीची सत्ता आलीय. अनेक वर्ष देशाबाहेर राहिलेले बीएनपीचे नेते तारिक रहमान (Tarique Rahman) हे बांगलादेशचे पंतप्रधान होणार आहे. तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या खालिदा जिया यांचा रहमान हा मुलगा आहे.
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी नुकसानभरपाई, भारतीय कुटुंबाला ‘इतके’ पैसे मिळणार का?
जमात आणि तरुणांनी बनविलेल्या पक्षाला जनतेने नाकारले
माजी पंतप्रधान शेख हसिना यांचा अवामी लीग पक्ष यंदा निवडणूक रिंगणात नव्हता. या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. शेख हसिना यांच्याविरोधात तरुणांनी उद्रेक केला होता. त्यामुळे त्या देश सोडून पळून गेल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा सामना जमात ए इस्लामी आणि तरुणांनी बनविलेल्या नॅशनल सिटिजन पार्टीच्या नेतृत्वाखाली 11 पक्षांबरोबरच्या आघाडीबरोबर होता. परंतु जनतेने तरुणांनी बनविलेला पक्ष आणि जमात ए इस्लामीला सत्ता दिलेली नाही. बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे पंतप्रधान होणार आहेत. तब्बल सतरा वर्षे देशाबाहेर राहत होते.
ज्योतिषाने केलं ‘ब्रेन वॉश’ आणि मुलीने ओलांडली क्रूरतेची सीमा, वाचा काय घडलं?
50 जागा महिलांसाठी राखीव
बांगलादेशमध्ये 350 खासदार आहे. त्यात 50 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. या जागा पक्षांच्या संख्याबळानुसार निवडल्या जातात. त्या जागांवर मतदान होत नाही. 300 जागांवर मतदान होते. एका उमेदवाराच्या निधनामुळे 299 जागांवर मतदान झाले. पहिल्यांचा दोन्ही पंतप्रधानांच्या अनुपस्थित ही निवडणूक झाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना बांगलादेशमधून पळून भारतात आलेल्या आहेत. तर खालिदा जिया यांचे मागील वर्षीच निधन झालेले आहे.
गयेश्वर चंद्र रॉय विजयी
बीएनपीचे वरिष्ठ नेते गयेश्वर चंद्र रॉय हे ढाका मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तब्बल 99 हजार मते घेऊन ते निवडून आलेले आहेत. त्यांनी जमात ए इस्लामाचे उमेदवार मोहम्मद शाहिनूर इस्लाम यांचा पराभव आहेत. रॉय हे हिंदू असून, बांगलादेशमध्ये ते अल्पसंख्याक आहेत. मुस्लिम बहुल भागातून ते निवडून आलेले आहे. ते बीएनपी पक्षाचे नेते आहे. 1990 साली ते सत्तेत होते. हिंदू अल्पसंख्याक लोकांवर तिथे अत्याचार, हत्या होत आहेत. त्यात ही एक महत्त्वाची घटना घडलीय.
