Bangladesh India Updates : बांग्लादेशात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला शह (Bangladesh India Updates) देण्यासाठी भारताने चाली टाकण्यास सुरुवात केली आहे. भारताने बांग्लादेशच्या तीस्ता आर्थिक क्षेत्र प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्र मंत्री यांची भेट घेतली. या काळात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तीस्ता ही भारत आणि बांग्लादेशातील प्रमुख नदी असून ती दोन्ही बाजूंना वाहेत.
या प्रकल्पाचा फायदा दोन्ही देशांना होणार आहे. त्याचवेळी पंतप्रधान शेख हसीना चीन किंवा भारत यांपैकी आधी कोणत्या देशाचा दौरा करणार याचंही उत्तर परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं. आम्ही तीस्ता नदीवर एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. भारताला त्यात गुंतवणूक करायची आहे. परंतु, बांग्लादेशच्या गरजांनुसार अंमलबजावणी व्हावी यासाठी आमचे प्राधान्य राहिल. पंतप्रधान शेख हसीना लवकरच भारत दौऱ्यावर येतील असेही त्यांनी सांगितले.
Bangladesh Train : मतदानाआधीच हिंसा! बांग्लादेशात रेल्वेला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू
अंतराचा विचार केला तर नवी दिल्ली आणि ढाका जवळ आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून शेख हसीना आधी भारताला भेट देतील असे संकेत मिळत आहेत. दोन्ही देशांतील बैठकी दरम्यान विनय क्वात्रा यांनी राजकीय, सुरक्षा, पाणी, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि संरक्षण यांसह अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला. दोन्ही बाजूंना भारतामार्फत नेपाळ आणि भूतानमधून जलविद्यूत आयात करण्याच्या प्रस्तावित योजनेवरही चर्चा केली. भारताला भेट देण्याची योजना आखत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया आणखी सोपी करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.