Download App

Bangladesh Train : मतदानाआधीच हिंसा! बांग्लादेशात रेल्वेला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू

Bangladesh Train Fire : भारताच्या शेजारी बांग्लादेशात निवडणुकांची जोरात (Bangladesh Election) सुरू होणार आहे. उद्या देशभरात निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच धक्कादायक बातमी येऊन धडकली आहे. काही दंगलखोरांनी प्रवासी (Bangladesh Train Fire) रेल्वेला आग लावली. या आगीत किमान पाच लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. बेनापोल एक्सप्रेस या रेल्वेला राजधानी ढाकाजवळील गोपीबाग भागात आग लावण्यात आली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस तलावात कोसळली; 17 जणांचा जागीच मृत्यू

देशात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विरोधी पक्षांनी मात्र निवडणुकीत भाग घेणार नसल्याचे स्पष्ट करत बहिष्कार टाकला आहे. त्यातूनच हा हिंसाचार उफाळल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अजूनही खात्रीशीर माहिती नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 9 वाजता रेल्वेला आग लावण्यात आली. आगीच्या घटनेची माहिती समजताच पोलीस आणि अग्निशमन विभागाची वाहने दाखल झाली. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता या आगीवर नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वेच्या चार डब्यांत ही आग वेगाने पसरली होती. मतदानाआधी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र हा प्रकार कुणी केला याची माहिती पोलिसांनी अजून तरी दिलेली नाही.

बांग्लादेशच्या निवडणुकीत हिंसाचार होणे ही आता नेहमीचीच गोष्ट झाली आहे. याआधीही निवडणुकीत अनेकवेळा हिंसाचार झाला आहे. माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि अन्य विरोधी गटांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वात निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होणार नाहीत असा आरोप या पक्षांनी केला आहे. काळजीवाहू सरकारने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी या पक्षांनी केली आहे. परंतु, सरकारने यासाठी घटनेत कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस तलावात कोसळली; 17 जणांचा जागीच मृत्यू

follow us

वेब स्टोरीज