Bangladesh Violence : दिपू दासनंतर, बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या

Bangladesh Violence : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार सुरु असून या हिंसाचारामध्ये आतापर्यंत अनेक अल्पसंख्याकांचा मृत्यू झाला

Bangladesh Violence

Bangladesh Violence

Bangladesh Violence : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार सुरु असून या हिंसाचारामध्ये आतापर्यंत अनेक अल्पसंख्याकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे आता  आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातीमनुसार बांगलादेशात आणखी एका हिंदु तरुणाची हत्या करण्यात आली आहे.  अमृत मंडल उर्फ सम्राट असं या तरुणाचे नाव आहे. 29 वर्षीय मंडलची हत्या राजबारी जिल्ह्यात झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी, दीपू चंद्र दास नावाच्या एका तरुणाचीही जमावाने हत्या केली होती. या घटनेवरून संपूर्ण भारतात निदर्शने होत आहेत. ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली मयमनसिंग (Bangladesh Violence) परिसरात जमावाने दीपू चंद्र दासची हत्या करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजता पांगशा उपजिल्ह्यातील होसैनडांगा ओल्ड मार्केटमध्ये अमृत मंडलवर (Amrit Mandal) हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. पांगशा मॉडेल पोलिस स्टेशनचे अधिकारी शेख मोईनुल इस्लाम म्हणाले की, स्थानिकांनी अमृत मंडलवर खंडणीचा आरोप केला होता.

अमृत मंडल टोळी खंडणीत सहभागी ?

तर दुसरीकडे स्थानिकांनी बांगलादेशी मीडिया आउटलेट द डेली स्टारच्या वृत्तानुसार, अमृत मंडल हा “सम्राट वाहिनी” नावाच्या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या होता. ही टोळी खंडणीत सहभागी होती. शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर गेल्या वर्षी सम्राट देश सोडून पळून गेला आणि अलीकडेच परतला. बुधवारी संध्याकाळी, तो आणि त्याच्या टोळीतील काही इतर सदस्य शाहिदुल इस्लाम नावाच्या एका गावकऱ्याच्या घरी पैसे उकळण्यासाठी गेले होते.

कुटुंबातील सदस्यांनी ते दरोडेखोर असल्याचा दावा करत आरडाओरड केली. गावकऱ्यांनी सम्राटला पकडले आणि त्याला मारहाण केली, तर टोळीतील उर्वरित सदस्य पळून गेले. पोलिसांनी सम्राटच्या एका साथीदाराला, मोहम्मद सलीमला अटक केली आहे.

‘तत्पर’ निवडणूक आयोगाचं कौतुक अन्…, रिकाम्या गाड्यांची तपासणी करताच रोहित पवारांचा टोला

ढाका येथे बॉम्ब स्फोट

बांगलादेशची राजधानी ढाका येथे बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला. ढाकाच्या मोघबाजार परिसरात हा स्फोट झाला. ही घटना ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला घडली. या एकामागून एक घटना घडल्याने बांगलादेशच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Exit mobile version