Download App

बांग्लादेशात मोठी घडामोड! टी 20 वर्ल्डकपसाठी क्रिकेट बोर्डाचे थेट लष्करप्रमुखांना पत्र

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल वकर उज जमान यांना पत्र लिहिले आहे.

Bangladesh News : बांग्लादेशात सत्तापालट होऊन (Bangladesh News) अंतरिम सरकार अस्तित्वात आलं आहे. तरी देखील येथील हिंसाचार कमी (Bangladesh Violence) झालेला नाही. या हिंसाचारामुळे बांग्लादेशात होणारा महिला टी 20 वर्ल्डकप  (Women’s T20 World Cup) संकटात सापडला आहे. आता हा वर्ल्डकप दुसऱ्या देशात शिफ्ट केला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच आता एक महत्वाची बातमी आली आहे. टी 20 विश्वकप आपल्याच देशात आयोजित करण्यासाठीचे प्रयत्न बांग्लादेशाने अजूनही सोडलेले नाहीत. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल वकर उज जमान यांना पत्र लिहिले आहे. या स्पर्धेसाठी सुरक्षिततेचं आश्वासन बोर्डाने मागितलं आहे. या स्पर्धा 27 सप्टेंबरपासून सराव सामन्यांसह सुरू होणार आहे.

आयसीसी (ICC) सध्या बांग्लादेशातील घडामोडींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. जर येथील हिंसाचार थांबला नाही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही तर अन्य ठिकाणांचा विचार सुरू करण्यात आला आहे. बांग्लादेशसारखाच टाइम झोन असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या देशात या स्पर्धा होऊ शकतात. त्यामुळे भारत, श्रीलंका, युएई (UAE) या देशांचा पर्याय आयसीसीसमोर आहे.

Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ

बांग्लादेशात निवडणुका होऊन नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत नोबेल पुरस्कार विजेते युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमूल हसन यांनाही देश सोडावा लागला. ते शेख हसीना यांच्या अवामी लीग (Awami League) पक्षाचे खासदार आहेत. बोर्डाचे काही पदाधिकारी सध्या ढाका (Dhaka News) शहरात आहेत.

बीसीबी अंपायर कमिटीचे चेअरमन इफ्तेखार अहमद मिठूने सांगितले की आम्ही या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गुरुवारी आम्ही सेनाप्रमुखांना एक पत्र पाठवले असून त्यांच्याकडून सुरक्षिततेचे आश्वासन मागितले आहे. कारण आता आमच्याकडे फक्त दोन महिनेच शिल्लक राहिले आहेत. आयसीसीने दोन दिवसांपूर्वी आमच्याशी संपर्क केला होता. आज अंतरिम सरकार गठीत झाल्यानंतर आम्हाला त्यांना सुरक्षिततेबाबत माहिती द्यायची आहे. यासाठीच आम्ही तातडीने पत्र पाठवले आहे. सेनाप्रमुखांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही याबाबत आयसीसीला (ICC) कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Bangladesh : धक्कादायक! हॉटेलच्या आगीत 8 होरपळले; हिंसक जमावाच्या मदतीने 500 कैदी पळाले

follow us