नवी दिल्ली : पाकिस्तानात (pakistan) गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं आहे, आधीच महागाई, गरिबी अशा समस्या असताना आता विजेचं (Electricity Supply) संकट पाकिस्तानवर कोसळलंय. बलुचिस्तानमधील(Baluchistan) क्वेटा, इस्लामाबाद, लाहोर, मुलतान आणि कराची या 22 जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकार असद अली(Asad Ali) यांनी ट्विटरद्वारे दिलीय. तर दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिघडली असून चीनच्या व्यावसायिक बॅंकांकडून पाकिस्तानने अधिक व्याजदराने कर्ज घेतल्याचीदेखील माहिती समोर आलीय. या बॅंकांकडून कर्ज घेतल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था (pakistanEconomy) बिघडल्याचं दिसून येतंय. चीनमधील वर्ल्ड बॅंकेकडून पाकिस्तानने कर्ज घेतलं आहे.
वीजेची टंचाई भासत असल्याने पाकिस्तानातील बाजारपेठा सायंकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत सांगण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश पाकिस्तान सरकाकडून काढण्यात आल्याची माहिती समोर आलीय. तर लाहोरमधील मॉल रोड, कॅनॉल रोड आणि इतर भागातील लोकांना वीजपुरवठा खंडित झाल्याने नागिरकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतंय. दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.
कराची, लाहोर, क्वेटासह बलुचिस्तानमधील 22 जिल्ह्यांमध्ये वीज नसू वीजपुरवठा खंडित झाल्यानं मेट्रो सेवेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. मेट्रो खोळंबल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तर इस्लामाबाद विद्युत पुरवठा कंपनीच्या 117 ग्रिड स्टेशनचा वीज पुरवठा देखील खंडित झाल्याने संपूर्ण शहर आणि रावळपिंडी अंधारात असल्याची परिस्थिती निर्माण झालीय.
यापूर्वी देखील पाकिस्तानमधील नागरिकांना विजेच्या संकटाचा सामना करावा लागत असून त्यावेळी कराची, लाहोरसह देशातील अनेक भागांत 12 तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, पाकिस्तानमध्ये सकाळी 7.30 वाजल्यापासून देशभरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही बातमी येत आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून लवकरच याबाबत माहिती देऊ, अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार असद अली तूर यांनी ट्विटरद्वारे दिलीय.
दरम्यान, पाकिस्तानने चायनीज बॅंकांकडून कर्ज घेतल्याने पाकिस्तान मोठ्या अर्थिक संकटात सापड़ल्याची माहिती समोर आलीय. आता पाकिस्तानकडून या संकटावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे.