फरार मेहुल चोक्सी भारतात परतणार? प्रत्यार्पणाला बेल्जियम न्यायालयाने दिली मंजुरी

Mehul Choksi : गेल्या काही वर्षांपासून फरार असलेला उद्योगपती मेहुल चोक्सी आता भारतात परतणार आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या

Mehul Choksi

Mehul Choksi

Mehul Choksi : गेल्या काही वर्षांपासून फरार असलेला उद्योगपती मेहुल चोक्सी आता भारतात परतणार आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या न्यायालयाने मंजुरी दिली आहे. चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी दोघेही पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी असून फरार आहे मात्र आता त्यांच्या भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला बेल्जियमच्या एका न्यायालयाने मंजुरी देत प्राथमिक आदेश जारी केला आहे. बेल्जियममधील अँटवर्प येथील न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये भारताच्या विनंतीवरून त्याच्या अटकेला वैधता देण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी

तर दुसरीकडे या प्रकरणात चोक्सीकडे (Mehul Choksi) आता देखील उच्च न्यायालयात (High Court) अपील करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे त्याला ताबडतोब भारतात आणले जाणार नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसेच त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची देखील माहिती अधिकाऱ्याने दिली.

तर दुसरीकडे न्यायालायने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय देत मेहुल चोक्सीच्या (Belgian Court) प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. अँटवर्प न्यायालयाने (Antwerp Court) शुक्रवारी भारतीय बाजू आणि चोक्सीच्या कायदेशीर पथकाच्या वतीने बेल्जियमच्या अभियोक्त्यांचे युक्तिवाद ऐकले. यानंतर न्यायालयाने भारताची प्रत्यार्पणाची विनंती आणि चोक्सीची अटक वैध असल्याचे मानले.

मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटू ठार, मालिका रद्द

सर्व जामीन प्रयत्न अयशस्वी

सीबीआयच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून अँटवर्प पोलिसांनी 65 वर्षीय मेहुल चोक्सीला 11 एप्रिल रोजी अटक केली होती. तो गेल्या चार महिन्यांपासून बेल्जियमच्या तुरुंगात आहे. चोक्सीने अनेक न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते, परंतु प्रत्येक वेळी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला

Exit mobile version