मेहुल चोक्सीचा स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा विचार अन् जाळ्यात अडकला; जाणून घ्या सविस्तर

Mehul Choksi : भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी एक असलेल्या 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) बेल्जियममध्ये (Belgium) अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तो गेल्या सात वर्षांपासून फरार होता आणि या दरम्यान तो तीन देशात राहत होता. बेल्जियममध्ये राहण्यासाठी माहिती लपवल्याच्या आरोपावरून अखेर त्याला बेल्जियम पोलिसांनी (Belgium Police) अटक केली आहे. अटक झाल्यानंतर आता लवकरच त्याला भारतात आणले जाणार आहे यासाठी प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.
2018 मध्ये गीतांजली ग्रुपचे प्रमुख मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला होता. त्याने सर्वप्रथम अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले. गुंतवणूक कार्यक्रमाद्वारे त्याने अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवले होते. तर 2021 मध्ये त्याने डोमिनिकन रिपब्लिकमध्ये (Dominican Republic) बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता तेव्हा त्याला अटक देखील करण्यात आली होती मात्र या प्रकरणात त्याने डोमिनिकाच्या न्यायालयाला सांगितले की, उपचारासाठी त्याला काही दिवस अँटिग्वाला (Antigua) जावे लागेल आणि त्यानंतर तो पुन्हा परत येईल तेव्हा त्याच्यावर खटला चालवण्यात यावा. या प्रकरणात 51 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला ब्रिटिश राणीकडून दिलासा मिळाला होता. यानंतर तो पुन्हा अँटिग्वाला पोहोचला.
या काळात सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) त्याचा शोध घेत होते. या दरम्यान तो बेल्जियममध्ये असल्याची माहिती सीबीआय आणि ईडीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय यंत्रणांनी बेल्जियमच्या यंत्रणांना सतर्क करुन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मात्र याबाबत त्याला माहिती मिळाली आणि यानंतर तो स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला याआधी बेल्जियम पोलिसांनी अटक केली. माहितीनुसार, मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती बेल्जियमची नागरिक आहे. त्यामुळे त्याने बेल्जियममध्ये राहण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती. त्याने त्याच्या अँटिग्वा आणि भारतीय नागरिकत्वाबद्दलची माहिती लपवली त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे गेल्या वर्षी त्याचे वकिलाने मुंबईतील एका न्यायालयात तो बेल्जियममध्ये रक्ताच्या कर्करोगावर उपचार घेत असल्याने तो भारतात परत येऊ शकत नाही असे सांगितले होते. मेहुल चोक्सीने म्हटले होते की तो भारतीय एजन्सींना सहकार्य करू शकतो. त्यांनी सांगितले होते की ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहतील. न्यायालयाने मेहुल चोक्सीचे म्हणणेही स्वीकारले नाही.
सत्ता बदलल्यानंतर काही नेते पक्ष बदलतात…पुढाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका; विखेंचा खोचक टोला
दुसरीकडे, एजन्सी त्याला कसे तरी प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करत होत्या. आता मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. तर आता चोक्सीच्या वकिलाने सांगितले की ते खराब प्रकृतीच्या कारणास्तव मेहुल चोक्सीला दिलासा मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.