Download App

सेक्स वर्कर्सनाही मिळणार प्रसूती रजा, पेन्शन अन् आरोग्य विमा, जाणून घ्या नवीन कायदा

Belgium New Law  :  सेक्स वर्कर्सच्या हक्कांना मान्यता देण्यासाठी आता बेल्जियमने (Belgium) नवीन कायदा (New Law) लागू केला आहे.

  • Written By: Last Updated:

Belgium New Law  :  सेक्स वर्कर्सच्या हक्कांना मान्यता देण्यासाठी आता बेल्जियमने (Belgium) नवीन कायदा (New Law) लागू केला आहे. ज्याची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. बेल्जियमने लागू केलेल्या नवीन कायद्यानुसार सेक्स वर्कर्सना प्रसूती रजा, पेन्शन, आरोग्य विमा सारखे फायदे मिळणार आहे.

2022 मध्ये बेल्जियमने लैंगिक कामाला गुन्हेगारीतून वळवले होते. तर आता संसदेत ऐतिहासिक कायदा लागू केला आहे. त्यामुळे आता सेक्स वर्कर्सना बेल्जियममध्ये इतर कामगारांसारखे फायदे मिळणार आहे.

बेल्जियमने 2022 मध्ये लैंगिक कार्याला गुन्हेगारीमधून हटवले होते. तर आता सेक्स वर्कर्संसाठी रोजगार हक्क निर्माण करणारा नवीन ऐतिहासिक कायदा लागू केला आहे. हा कायदा सेक्स वर्कर्सना इतर व्यवसायांप्रमाणेच संरक्षण देतो. बेल्जियमचा हा नवा कायदा 2022 मध्ये झालेल्या विरोधानंतर लागू करण्यात आले आहे. कोरोना काळात सेक्स वर्कर्ससाठी सरकारने काही न केल्याने सरकरविरोधात निषेध सुरू झाले होते. नवीन कायदा बेल्जियममध्ये 1 डिसेंबरपासून लागू झाला आहे.

याबाबत माहिती देताना  बेल्जियन युनियन ऑफ सेक्स वर्कर्स (UTSOPI) चे अध्यक्ष व्हिक्टोरिया यांनी सांगितले की, जर कोणताही कायदा नसेल आणि तुमची नोकरी बेकायदेशीर असेल, तर तुम्हाला मदत करण्यासाठी कोणताही प्रोटोकॉल नाही. या कायद्यामुळे सेक्स वर्कर्सना सुरक्षा मिळेल आणि नवीन कायद्यामुळे सेक्स वर्कर्सना जास्त कमाई करण्याची संधी निर्माण होणार आहे आणि इतर कामगारासारखे फायदे देखील त्यांना मिळणार आहे. अशी माहिती बेल्जियन युनियन ऑफ सेक्स वर्कर्सचे अध्यक्ष व्हिक्टोरिया यांनी दिली.

विधानसभेत पराभव झाला म्हणून… राजकारण संपलेले नाही; लंके कडाडले

याच बरोबर मानवाधिकार वकिलांनी या कायद्याचे कौतुक केले आहे. “हे एक क्रांतिकारी पाऊल आहे,” ह्युमन राइट्स वॉचच्या एरिन किलब्राइड म्हणाल्या की, सेक्स वर्कर्सच्या संरक्षणासाठी जगभरात उचललेले हे सर्वोत्तम पाऊल आहे.

follow us