उद्या भारताला मिळणार 2 पदके? हॉकीत बेल्जियमशी भिडत, पहा 1 ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक

उद्या भारताला मिळणार 2 पदके? हॉकीत बेल्जियमशी भिडत, पहा 1 ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक

Paris Olympics Day 6 Schedule : भारतीय संघासाठी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा (Paris Olympics 2024) पाचवा दिवस चांगला गेला आहे. त्यामुळे आता भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा देखील वाढत आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने (Swapnil Kusle) पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठली. गुरुवारी तो भारताला तिसरे पदक मिळवून देईल अशी अपेक्षा आहे.

तर दुसरीकडे भारतीय पुरुष हॉकी संघ ग्रुप बी मध्ये बेल्जियमशी भिडणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी गुरुवारी भारतीय खेळाडू किमान दोन सुवर्णपदक स्पर्धांमध्ये भाग घेतील.

बॉक्सिंगमध्ये, निखत जरीन महिलांच्या 50 किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये आव्हान देणार आहे. याच बरोबर गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा गोल्फ पुरुषांच्या वैयक्तिक स्ट्रोल प्ले फेरी-1 मध्ये भारतासाठी आव्हान देणार आहे.

सहाव्या दिवशी भारताचे वेळापत्रक

ऍथलेटिक्स

पुरुष : 20 मीटर वॉकिंग रेस, (परमजीत सिंग बिश्त, आकाशदीप सिंग, विकास सिंग) (सकाळी 11 वाजता)

महिला : 20 मीटर वॉकिंग रेस (प्रियांका) (दुपारी 12.50 वाजता )

गोल्फ

पुरुष : वैयक्तिक स्ट्रोक प्ले राऊंड -1 (गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा) (दुपारी 12.30 वाजता)

शूटिंग

पुरुष : 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स फायनल (स्वप्नील कुसळे) (दुपारी 1 वाजता)

महिला : 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स पात्रता (सिफत कौर समरा आणि अंजुम मौदगिल) (दुपारी 3.30 वाजता)

हॉकी

भारत विरुद्ध बेल्जियम (दुपारी 1.30 वाजता )

बॉक्सिंग

महिला : (50 किलो गट उपउपांत्यपूर्व फेरी) (निखत झरीन विरुद्ध चीन (दुपारी 2.30 वाजता)

तिरंदाजी

पुरुष : वैयक्तिक (1 ते 32 एलिमिनेशन राऊंड): प्रवीण जाधव विरुद्ध चीन (दुपारी 2.31 वाजता)

नौकानयन

पुरुष : डिंगी रेस वन (विष्णू सरवणन) (दुपारी 3.45 वाजता)

पुरुष : डिंगी रेस टू (विष्णू सरवणन) रेस 1 नंतर

महिला : डिंगी रेस वन ( नेत्रा कुमनन (रात्री 7.05 वाजता)

लोव्हलिना बोर्गोहेन उपांत्यपूर्व फेरीत, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळणार तिसरं पदक?

महिला : डिंगी रेस टू: (नेत्रा कुमनन) रेस 1 नंतर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube