Paris Olympics 2024 : अर्जेंटिनाला धक्का, हॉकीमध्ये भारताने पुन्हा केली कमाल, सामना अनिर्णित

Paris Olympics 2024 : अर्जेंटिनाला धक्का, हॉकीमध्ये भारताने पुन्हा केली कमाल, सामना अनिर्णित

 Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) आपल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (Ind Vs NZ) पराभव केला होता. तर आज ग्रुप बीच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना अर्जेंटिनाविरुद्ध (IND vs ARG) झाला. या सामन्यात भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. हा सामना 1-1 ने असा बरोबरीत सुटला या सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाने पहिला गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली होती.

भारताला त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करता आला नाही.  मात्र चौथ्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत भारताचा या सामन्यात कमबॅक करून दिला आणि हा सामना 1-1 ने  बरोबरीत आणला. अगदी शेवटच्या सामन्यात भारताने गोल करत अर्जेंटिनाला धक्का दिला आहे. तर आता ग्रुप बी मध्ये भारताचा तिसरा सामना आयर्लंडशी 30 जुलै रोजी होणार आहे.

तर भारताचा चौथा सामना 1 ऑगस्टला बेल्जियम आणि 2 ऑगस्टला ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध होणार आहे. दोन्ही गटातील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

तर दुसरीकडे नेमबाजीत भारताचा अर्जुन बाबौता (Arjun Babauta) 10 मीटर एअर रायफलमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्याने तो ऑलिम्पिक पदक जिंकण्यापासून हुकला आहे. या इव्हेंटमध्ये चीनच्या शेंग लिहाओने सुवर्णपदक पटकावले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube