Download App

Bill Gates : कोरोना काळात भारताने अभूतपूर्व काम केले, मोदींसोबत भेटीत बिल गेट्स यांचे गौरवोद्गार

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  मायक्रोसॉफ्टचे ( Microsoft )  संस्थापक बिल गेट्स ( Bill Gates ) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi )  यांची शुक्रवारी भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये आरोग्य क्षेत्र, जलवायु परिवर्तन, भारताची जी-20 अध्यक्षता इ. विषयांवर चर्चा झाली, असे बिल गेट्स यांनी सांगितले आहे. बिल गेट्स यांनी आपल्या अधिकृत ब्लॉग गेट नोट्स वर या भेटीविषयी लिहिताना भारताचे कौतुक केले आहे.

भारताने कोरोना महामारीच्या काळात स्वस्त व सुरक्षित कोरोना डोस यांची निर्मिती केली व जगभरातील लोकांना देखील दिली. त्यामुळे जगातील लोकांचे प्राण वाचले आहेत. यातील अनेक डोस हे गेट्स फाउंडेशनच्या मदतीने देखील वाटण्यात आल्याचे गेट्स यांनी म्हटले आहे.

Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन

भारताने फक्त स्वस्त व सुरक्षित कोरोना डोस नाही बनवले तर, अत्यंत योग्य रितीने डोस देण्याचे काम   केले आहे.  यासाठी भारतात CO-WIN सारखे अॅप तयार करण्याता आले. त्यामुळे 220 कोटींपेक्षा अधिक कोविड व्हॅक्सिनचे डोस लोकांना देण्यात मदत झाली आहे. लोक आपल्या घरात बसून व्हॅक्सीनला शेड्यूल करु शकत होते. याचसोबत त्यांना डिजिटल सर्टिफिकेट देखील अगदी सहज प्राप्त झाले, अशा शब्दात बिल गेट्स यांनी भारताचे कौतुक केले आहे.

यावेळी बिल गेट्स यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षतेवर देखील भाष्य केले आहे. भारताची जी-20 अध्यक्षता ही बाकीच्या देशांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या माध्यमातून इतर देश डिजिटल पेमेंट, डिजिटल आयडी (आधार ) अशा गोष्टी उत्तम प्रकारे आत्मसात करु शकतात. याचसोबत भारतात आरोग्य, विकास आणि जलवायु परिवर्तन हे विषयांच्या बाबतीत पहिल्यापेक्षा आता खुप चांगले काम सुरु आहे. भारत देश अशाच प्रकारे प्रगतीच्या वाटेवर चालत राहील व जगाला नवीन तंत्रज्ञानाची माहिती देत राहील, असे बिल गेट्स म्हणाले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिल गेट्स यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे.

 

Tags

follow us