Download App

पाकिस्तानची बत्ती गुल! कराचीसह अनेक शहरं अंधारात; मोबाईल चार्जिंगसाठी नागरिकांची धावाधाव

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan)पुन्हा एकदा विजेचं (Electricity Shortage)मोठं संकट ओढवलं आहे. ट्रान्समिशन लाईन बंद पडल्यानं कराचीसह (Karachi)पाकिस्तानमधील अनेक शहरं अंधारात बुडाली आहेत. याबाबत पाकिस्तानी चॅनलनंच एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, तांत्रिक बिघाडामुळं उच्च तणाव (HT) ट्रान्समिशन केबल ट्रिप झाली आणि कराची शहासह विविध शहरांमधील अनेक भागात वीजपुरवठा (power supply) खंडित झाला आहे. मोबाईल चार्जिंगसाठी नागरिकांची धावाधाव सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

हाय टेंशन (HT) ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्यानं कराचीचा जवळपास 40 टक्के भाग अंधारात बुडाला आहे. त्यामुळं अनेक ग्रीड स्टेशनमध्ये ट्रिपिंग झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Assembly : लव्हजिहादवरुन नितेश राणे व अबू आझमी यांच्यात जुंपली

वृत्तानुसार, कराचीमधील चौरंगी, सदर, लाइन्स एरिया, डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA), पंजाब कॉलनी, गुलिस्तान-ए-जौहर, कोरंगी येथे वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, कराचीमधील वीजपुरवठा कंपनी के-इलेक्ट्रिककडून अद्याप कोणतंही निवेदन जारी करण्यात आलं नाही.

यापूर्वी जानेवारीमध्येही, राष्ट्रीय ग्रीडमधील वारंवार चढ-उतारांमुळं, पाकिस्तानमध्ये तीव्र वीज संकट निर्माण झालं होतं, त्यामुळंही कराची अंधारात बुडाली होती.

के-इलेक्ट्रिकचे प्रवक्ते इम्रान राणा यांनी सांगितलं की, राष्ट्रीय ग्रीडची वारंवारता कमी झाली आहे. त्यामुळं कराचीसह पाकिस्तानामधील अनेक शहरांमधील वीज खंडित झाली. के-इलेक्ट्रिकचे नेटवर्क सुरक्षित आणि सुरक्षित असल्याची ग्वाही राणा यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले की त्यांचं पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, प्रभावित भागात वीज पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच हा वीजपुरवठा सुरु होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us