Bangladesh Election Result 2026: : हिंसेने पोळलेल्या बांगलादेशमध्ये (Bangladesh) आता अंतरिम सरकार जावून जनतेने निवडलेले सरकार स्थापन होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (BNP) ला जनतेने स्पष्ट बहुमत दिलंय. तिनशेपैकी 209 जागा बीएनपीने जिंकल्यात. तर जमात पक्ष अवघ्या 68 जागाच जिंकू शकला. बीएनपीचे नेते तारिक रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान होणार आहेत. बीएनपीमधून एक हिंदू व्यक्ती निवडून आलेला आहे. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहे. मध्यतंरी हिंदू लोकांवर तिथे अत्याचार झाले, अनेकांचा हल्ल्यात मृत्यू झाला. कट्टरपंथियांकडून मंदिरांची तोडफोड झाली. त्यात दिलासा देणारी ही घटना आहे. (BNP’s Hindu candidate Gayeshwar Chandra Roy has won from Dhaka-3 )
बीएनपीचे हिंदू उमेदवार गयेश्वर चंद्रक रॉय (Gayeshwar Chandra Roy) हे खासदार झाले आहेत. तेही बांगलादेशचे राजधानी ढाकामधील ढाका-तीन या मतदारसंघातून. त्यांनी जमात ए इस्लामी पक्षाचे उमेदवार एमडी शाहिनूर इस्लाम यांचा पराभव केला आहे. गयेश्वर चंद्रक रॉय यांना 98 हजार 785 मते मिळाली. तर जमातचे उमेदवार एमडी शाहिनूर इस्लाम यांना 82 हजार 232 मते मिळाली आहे. तर विशेष म्हणजे जमात ए इस्लाम पक्षानेही खुलाना या मतदारसंघातून हिंदू व्यक्ती कृष्णा नंदी यांना उमेदवारी दिली होती. पण बीएनपीचे आमिर इजाज खान यांनी त्यांचा पराभव केला. नंदी यांना 70 हजार, तर खान यांना 1,21 हजार मते मिळाली होती.
गयेश्वर यांची निवड ही दोन धार्मिक तणावातही ही दिलासा देणारी घटना आहे. कारण पंतप्रधान हसिना शेख यांच्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदू व्यक्तींवर हल्ले झाले होते. त्यात हिंदू खासदार निवडून आला आहे.
गयेश्वर चंद्र रॉय कोण आहेत ?
गयेश्वर चंद्र रॉय यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1951 मध्ये रोजी ढाकामधील केरानीगंज येथे झाला. त्यांचे आई-वडिल गन्नंद्र चंद्र रॉय आणि सुमोती रॉय हे फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये राहिले होते. रॉय हे बीएनपी पक्षाकडून 1990 च्या दशकातही निवडून आले होते. ते बीएनपी सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यांच्याकडे पर्यावरण आणि वन राज्यमंत्री, मत्स्यव्यवसाय आणि पशुधन राज्यमंत्री अशी महत्त्वाची पदे होती. रॉय यांचे बीएनपीशी कौटुंबिक संबंध आहेत. कारण त्यांचा मुलगा अमिताव रॉय यांचे बीएनपी नेते निताई रॉय चौधरी यांच्या मुलीशी लग्न झालेले आहे.
