Download App

‘ऑपरेशन सिंदूर’नं बिथरला पाकिस्तान; भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे ‘हे’ 5 पर्याय

पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.

Operation Sindoor : भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) दणक्यात बदला आहे. बळकट सुरक्षा व्यवस्थेचा बाता मारणाऱ्या पाकिस्तानात घुसून भारताने एअर स्ट्राइक (Operation Sindoor) केली. पाकिस्तानच्या हद्दीत प्रत्यक्षात एकही भारतीय विमानाने प्रवेश केला नाही. भारतातूनच टार्गेट सेट करण्यात आले आणि जोरदार हल्ले करण्यात आले. हल्ले सुद्धा इतके अचूक होते की जे ठरवलं तेच घडलं. भारताच्या या स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.

भारताने पाकिस्तानला अशा पद्धतीने मारलं आहे की पाकिस्तान ना आरडाओरडा करू शकतो ना कोणतीही कारवाई करू शकतो. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर चीन आणि तुर्की वगळता एकही देश पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला नाही. अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने भारतातील नागरी वसाहती आणि सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याची हिंमत केली तर याचे काय परिणाम होतील याचा अंदाज पाकिस्तानलाही आहे. या व्यतिरिक्त पाकिस्तानकडे कोणते दोन पर्याय आहेत हे समजून घेऊ या..

Operation Sindoor : 1 मिनिट 40 सेकंदांचा व्हिडिओ; दोन महिला अधिकारी अन् तीन संदेश

सीमेवर गोळीबार

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून एलओसीवर सातत्याने गोळीबार केला जात आहे. दररोज सीजफायरचे उल्लंघन होत आहे. भारतीय सुरक्षा दलांकडून याचे जोरदार उत्तर दिले जात आहे. आता भारताच्या हल्ल्यानंतर गोळीबाराच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. या मार्गाने भारताला आणखी त्रास देण्याचे काम पाकिस्तानकडून होऊ शकते. बुधवारी एअर स्ट्राइकनंतर जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात एलओसी नजीकच्या परिसरात गोळीबार झाला. पाकिस्तानच्या या गोळीबारात 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सुरक्षा परिषदेकडे जाता येईल

काही तज्ज्ञांच्या मते पाकिस्तान पुन्हा हा मुद्दा घेऊन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) जाऊ शकतो. याठिकाणी चीन पाकिस्तानला (China Pakistan) साथ देऊ शकतो. यानंतर पाकिस्तान नक्कीच काही ना काही तरी करील. शांत बसणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

भारतावर हल्ला करू शकतो का पाकिस्तान

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान भारतावर अशाच प्रकारचा हल्ला करू शकतो का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. पण जाणकारांच्या मते पाकिस्तान इतकी मोठी चूक करणार नाही. कारण याचे काय परिणाम होतील याची माहिती पाकिस्तानला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत फक्त दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट केले आहे. पाकिस्तानातील कोणत्याही नागरी ठिकाणांचे नुकसान झालेले नाही.

जर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर कुठे हल्ला करील असा प्रश्न आहे. कारण भारतात दहशतवाद्यांचे अड्डे नाहीत. अशात जर पाकिस्तानने हल्ला केलाच तर भारताच्या सैन्य ठिकाणांवरच करू शकतो. जर असे झाले तर मग सरळसरळ युद्धालाच तोंड फुटेल. पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. जाणकारांच्या मते पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची चूक करणार नाही.

Video : अचूक ऑपरेशन अन् हनुमानाचा आदर्श; ऑपरेशन सिंदूरबाबत राजनाथ सिंह काय म्हणाले?

शांततेच्या संधीची वाट

काही जाणकारांच्या मते पाकिस्तान सध्याच्या परिस्थितीत शांततेच्या कालावधीची प्रतिक्षा करू शकतो. कारण भारताशी सरळसरळ युद्ध करण्याची पाकिस्तानची लायकी नाही. तसेच भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी पाकिस्तानकडे ठोस कारणही नाही. तरी देखील जर पाकिस्तानने हल्ला करण्याचा विचार केला तर त्याला जगातून टीकेचा भडीमार सहन करावा लागेल. अमेरिकेसारख्या देशांचे सहकार्यही मिळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला सध्याच्या परिस्थितीत शांत राहण्याशिवाय पर्याय नाही असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान दहशतवादाला संपवणार का

पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर भारताने केलेल्या हल्ल्यात 70 ते 100 अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी सैन्याने मात्र सहा वेगवेगळ्या ठिकाणी 24 हल्ले झाल्याचे मान्य केले आहे. यात 26 पाकिस्तानी मारले गेले आणि 46 जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याने दिली आहे. यावरून स्पष्ट होते की मारले गेलेले लोक दहशतवादी नाहीत असेच पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तान दहशतवाद संपवण्यासाठी कधीच प्रयत्न करणार नाही हेही यावरुन स्पष्ट होत आहे. हा पर्याय पाकिस्तान कधीच स्वीकारणार नाही.

follow us