Brazil President on Donald Trump : ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, लुला जेव्हाही इच्छितात तेव्हा (Trump) माझ्याशी बोलू शकतात. लुला यांनी हा प्रस्ताव फेटाळला आणि म्हणाले की, ‘मी ट्रम्प यांना टॅरिफवर चर्चा करण्यासाठी फोन करणार नाही. असं ते म्हणाले आहेत.
ते पुढं म्हणाले तुम्हाला बोलण्याऐवजी, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग सारख्या नेत्यांशी बोलायचं आहे. अमेरिकेने ब्राझीलवर 50 टक्के कर लावला आहे. ब्राझील या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेत जाण्याचा विचार करत आहे. लुला यांनी असेही म्हटले की जरी ते ट्रम्प यांच्याशी बोलले नाहीत तरी ते नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या COP-३० हवामान शिखर परिषदेत ट्रम्प यांना नक्कीच आमंत्रित करतील. अमेरिकेने अलीकडेच ब्राझीलवर 50 टक्के कर लावला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या मते, माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावर कारवाई केल्यामुळे हा कर लावण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्पने मोदींना खिंडीत गाठले; टॅरिफ लादून घेणार की रशियाच्या मैत्रीला जागणार..
ट्रम्प यांनी बोल्सोनारो यांच्यावरील कारवाईला जादूटोणा म्हणजेच सूडाचे कृत्य म्हटले आहे. 2022 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बोल्सोनारो यांच्यावर सत्तापालट करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे अमेरिका आणि ब्राझीलमधील संबंध आणखी बिघडले आहेत. 8 जानेवारी 2023 रोजी ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये झालेल्या दंगलींसाठी बोल्सोनारो यांच्यावर सत्तापालट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की ब्राझीलमध्ये मुक्त निवडणुकांवर हल्ला होत आहे आणि अमेरिकन लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले जात आहे.
यामुळे 1 ऑगस्ट 2025 पासून ब्राझीलमधून अमेरिकेत येणाऱ्या सर्व उत्पादनांवर 50 टक्के कर लादला जाईल. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले की, ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो हे एक आदरणीय नेते आहेत. त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली ती आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणी आहे. हा खटला ताबडतोब संपला पाहिजे. त्यांनी बोल्सोनारो यांना पुढील निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आल्लेख केला.
त्याचबरोबर ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल अँड रंबलवरील सेन्सॉरशिप आदेशांचाही उल्लेख केला. 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीत बोल्सोनारो यांच्या पराभवानंतर देशात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली होती. माजी अध्यक्ष बोल्सोनारो यांना 2030 पर्यंत ब्राझीलमध्ये निवडणूक लढवण्यास बंदी आहे. जुलै 2022 मध्ये बोल्सोनारो यांनी 8 परदेशी राजदूतांसोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी ब्राझीलच्या निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि हेराफेरीचा आरोप केला.