Download App

Turkey Earthquake : दर्जाहीन बांधकाम करणाऱ्या बिल्डरांच्या मुसक्या आवळल्या

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : तुर्कस्तानमध्ये (Turkey Earthquake) गेल्या सोमवारी झालेल्या भूकंपानंतर प्रचंड विध्वंसाचे दृश्य पाहायला मिळत आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये एकूण मृतांची संख्या 30 हजारांच्या आसपास पोहोचली आहे. केवळ तुर्कीमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर जखमींचा आकडा 80 हजारांच्या आसपास पोहोचला आहे. दरम्यान, तुर्कस्तानमध्ये इमारत बांधकामाशी संबंधित कंत्राटदारांच्या अटकेचे सत्रही तीव्र झाले आहे.

भूकंपात (Earthquake) कोसळलेल्या इमारतींच्या बांधकामाप्रकरणी तुर्कस्तानमध्ये शेकडो लोकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. भूकंपामुळे कमकुवत झालेल्या आणि कोसळलेल्या इमारतींच्या बांधकामात हे लोक गुंतले होते.

या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून हजारो लोकांचा मृत्यू झाला. तुर्की पोलिसांनी यापूर्वीच 130 जणांना ताब्यात घेतले आहे किंवा वॉरंट जारी केले आहे. यातील बहुतांश बांधकाम ठेकेदारांचा समावेश आहे. यामध्ये आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

Bigg Boss 16 Winner : एमसी स्टॅनने जिंकली ‘बिग बॉस 16’ ची ट्रॉफी

तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओकटे यांनी सांगितले की, 130 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यासाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे. यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे. ते बांधकामाच्या कामात गुंतलेले असून इमारतींच्या पडझडीला तेच जबाबदार असल्याचा संशय आहे. त्याच वेळी, तुर्कीच्या न्यायमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी या घटनेसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाला शिक्षा देण्याची शपथ घेतली आहे. आम्ही पुरावे गोळा करत आहोत. काही दिवसात एकेक गुन्हेगार तुरुंगात जाईल.

मृतांचा आकडा 30,000 हजारांच्या जवळपास
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 30,000 च्या जवळपास पोहचली आहे. तर किमान 80,000 लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकर्ते अविरत काम करत आहेत.

Tags

follow us