Download App

मोदी सरकारचा इलेक्शन प्लॅन! महागाई अन् नाराजी टाळण्यासाठी रशियाकडून गहू खरेदी

Inflation : देशातील वाढती महागाई (Inflation) आणि जवळ येत असलेल्या निवडणुका यांमुळे मोदी सरकारची कोंडी होताना दिसत आहे. वाढती महागाई कमी करण्यासाठी भारत आता आपल्या जु्न्या आणि विश्वासू मित्र रशियाची (Russia) मदत घेणार आहे. क्रूड ऑइलनंतर आता गहू आयात करण्याचा विचार केला जात आहे. यासाठी केंद्र सरकारने तयारीही पूर्ण केली आहे. ज्य पद्धतीने रशियाने सवलतीच्या दरात तेल दिले त्याच पद्धतीने गहू (Wheat) सुद्धा देईल.

सध्या देशात महागाई प्रचंड वाढली आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाईने मागील 15 महिन्यांचे रेकॉर्ड मोडीत काढले. भाजीपाल्यासह गव्हाच्याही किंमती वाढल्या. त्यामुळे गव्हाचे पीठही महागले. मागील दोन महिन्यांच्या काळात गव्हाच्या किंमतीत दहा टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. यावर्षी गव्हाच्या साठ्यात घट होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर सरकार अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे.

भारतीय कफ सिरपमुळे 65 बालकांचा मृत्यू; औषधांची चाचणी टाळण्यासाठी 33 हजार डॉलरची लाच

देशातील गव्हाचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या. रशियाकडून सवलतीच्या दरात गहू खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयामुळे वाढती महागाई नियंत्रणात येईल तसेच आगामी लोकसभा निवडणूक काळात परिस्थिती नियंत्रणात राहिल असे सरकारला अपेक्षित आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात सध्या 30 ते 40 लाख मेट्रिक टन गव्हाची मागणी आहे. मात्र सरकार रशियाकडून 80 ते 90 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करू शकते. गरजेपेक्षा जास्त गहू आयात केला तर देशातील महागाई कमी करता येईल असा सरकारचा विचार आहे. 1 ऑगस्ट रोजी सरकारी गोदामात 28.3 मिलियन टन गहू साठ्याची नोंद करण्यात आली होती. हा साठा मागील दहा वर्षांच्या सरासरी साठ्याच्या तुलनेत 20 टक्के कमी आहे. या कारणामुळेच सरकार महागाईच्या बाबतीत सतर्क झाले आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात? न्यायालयाकडून अटक करण्याचे आदेश

निवडणुकांआधी परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे राहणार नाही. त्यामुळे आधीच गहू आयात करून हे संभाव्य संकट टाळण्याच्या प्लॅन मोदी सरकारने केला आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की क्रूड ऑइलप्रमाणेच गहू सुद्धा सवलतीच्या दरात देण्याचे रशिया म्हणत आहे. गहू खरेदीवर प्रति टन 25 ते 40 डॉलर सवलत देण्याची रशियाची तयारी आहे. यामुळे भारताला मोठा फायदा होईल. गव्हाव्यतिरिक्त अन्य खाद्यपदार्थांच्या व्यवहारासाठीही रशिया तयार आहे. सध्या भारत सूर्यफूल तेल सुद्धा रशियाकडूनच खरेदी करत आहे.

Tags

follow us