Download App

Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग नवे राज्यपाल ? नव्या चर्चाना सुरुवात

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची मागणी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Governor of Maharashtra) कोण होणार, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. आज यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच नाव समोर येत आहे.

काय म्हणाले होते भगतसिंग कोश्यारी?

वादग्रस्त विधानामुळे भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) सतत चर्चेत आहेत. महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात मोर्चा काढल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसापूर्वी त्यांनी तसं जाहीरही केलं होत. त्यांनी म्हटलं होत की माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

कॅप्टन अमरिंदर सिंग कोण आहेत?

कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत. पण पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अमरिंदर सिंग यांनी सुरुवातीला स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भारतीय सैन्यात प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१७ ते २०२२ या काळात ते पंजाबचे मुख्यमंत्री होते. याशिवाय ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेत चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केलं होतं. त्यामुळं नाराज होऊन त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

Tags

follow us