Download App

मनीष सिसोदियांच्या कार्यालयावर सीबीआय पुन्हा छापेमारी ? पण सीबीआयकडून स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्याचा आरोप केला आहे. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांनी ट्विट केले की, “आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या कार्यालयावर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही तपास केला. माझ्याविरुद्ध काहीही मिळाले नाही. ते मिळणार नाही. कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी प्रामाणिकपणे दिल्लीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम केले आहे.” पण, सीबीआयच्या सूत्रांनी छापा टाकल्याचा दाव्यांना स्पष्ट नकार दिला आहे. सिसोदिया यांच्या परिसरात छापा टाकण्यात आलेला नाही. काही कागदपत्रांची पडळताळणी करण्यासाठी एक टीम सिसोदिया यांच्या कार्यालयात गेली होती, असं सीबीआयकडून सांगण्यात आलं.

दिल्लीतील प्रसिद्ध मद्य धोरणातील अनियमिततेची केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (CBI) चौकशी करत आहे. या प्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल केला होता. याबाबत गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला होता.

सीबीआयच्या छाप्यावरुन आम आदमी पक्षाने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पक्षाने ट्विट केले आहे की, “पुन्हा एकदा मोदीजींची सीबीआय मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात पोहोचली. पण शेवटच्या छाप्यात काय सापडले ते त्यांनी आजपर्यंत सांगितलेले नाही? कारण घर, कार्यालय, बँक लॉकर आणि अगदी मनीषजींच्या गावाची देखील चौकशी केली आहे.

Tags

follow us