Central African Republic Stampede : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकच्या राजधानीतील एका शाळेत स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत (Central African Republic Stampede) 29 मुलांचा मृत्यू झाला आहे तर 260 पेक्षा जास्त जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बांगुई (Bangui) येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या (Barthelemy Boganda High School) परिसरात गुरुवारी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर स्फोट झाला. यानंतर शाळेत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 260 पेक्षा जास्त जखमी झाले असून आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, घटनेच्या वेळी शाळेत तब्बल 5000 विद्यार्थी उपस्थित होते.
Twenty-nine students taking their high school exams in the Central African Republic died in a stampede sparked by an exploding power transformer, the health ministry told AFP on Thursday ➡️ https://t.co/tKMaYcQ8LO pic.twitter.com/PwWhXIvDrg
— AFP News Agency (@AFP) June 26, 2025
जखमींवर उपचार सुरू
तर दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 16 मुलींसह अनेकांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 260 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारताच्या अडचणीत वाढ, 4 वर्षांनंतर इंग्लंडच्या संघात ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री