भारताच्या अडचणीत वाढ, 4 वर्षांनंतर इंग्लंडच्या संघात ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

IND vs ENG 2025 : भारताविरुद्ध सुरु असणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी (IND vs ENG) इंग्लंड संघाने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात तब्बल चार वर्षांनंतर स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता इंग्लंडची गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात दुसरा कसोटी समाना 2 जूलैपासून बर्मिंगहॅममध्ये सुरु होणार आहे.
तब्बल चार वर्षांनंतर जोफ्रा आर्चरने चेस्टर-ले-स्ट्रीट येथे डरहमविरुद्धच्या रेड बॉल क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. या सामन्यात जोफ्रा आर्चरने 18 षटकांत 31 धावा देत 1 विकेट घेतली आणि फलंदाजीला 32 धावा केल्या. आर्चरने 2021 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या महिन्याच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमध्ये आर्चर परतणार असल्याचे संकेत दिले होते.
तर दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्या झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा इंग्लंडने 5 विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघासाठी दुसरा कसोटी सामना खूप महत्वाचा असणार आहे. हेडिंग्ले येथे इंग्लंडच्या फलंदाजांची कामगिरी दमदार होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने 5 विकेट्सने विजयाची चव चाखली. बेन डकेटच्या 149 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताने दिलेल्या 371 धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
Jofra Archer is 𝑩𝑨𝑪𝑲 🔥
Our squad to take on India in the second Test has just dropped 📋👇
— England Cricket (@englandcricket) June 26, 2025
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:
बेन स्टोक्स, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर.