भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘या’ स्टार खेळाडूला तब्बल 3 वर्षांनंतर संधी

ENG vs IND 2025 : भारताविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची (ENG vs IND 2025) घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने तब्बल 3 वर्षांनंतर संघात अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनला (Jamie Overton) स्थान दिले आहे. ओव्हरटनला नुकतंच वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान देण्यात आले होते.
ओव्हरटनने 2022 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेत 97 धावा केल्या होत्या. ओव्हरटनला 97 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने 2,383 धावा केल्या आहेत. तर त्याने गोलंदाजीत 237 विकेट्स घेतले आहे.
तर दुसरीकडे भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी वोक्स आणि बेथेललाही संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये (IPL 2025) आरसीबीकडून (RCB) खेळताना जेकब बेथेलने शानदार कामगिरी केली होती. तर क्रिस वोक्सला देखील इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. 2024 नंतर वोक्स पुन्हा एकदा कसोटीमध्ये इंग्लंड संघात पुनरागमन करणार आहे.
Series Loading : ◼◼◼◻
Who is the first name in your XI?
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/YxUeU4Vv3z
— England Cricket (@englandcricket) June 5, 2025
दुखापतीचे संकट
मार्क वूड, ऑली स्टोन आणि जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीतून बरे होत असल्याने या मालिकेतील पहिले दोन किंवा तीन सामने मुख्य फास्ट गोलंदाजांशिवाय खेळावे लागू शकतात. माहितीनुसार, जोफ्रा आर्चर 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी फिट होऊ शकते. आर्चरला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अंगठ्याला दुखापत झाली होती.
भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स