दक्षिण आफ्रिकेची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक; ७ गडी राखून इंग्लंडला केलं चीतपट

South Africa Beaten England by Seven Wickets : दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी ब गटातील अखेरच्या सामन्यात या संघाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. (Wicket) आफ्रिकन संघाने 29.1 षटकांत 3 गडी गमावून 180 धावांचे लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने षटकार ठोकत संघाला विजयी केलं.
न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलकडे टीम इंडियाची कमान, रोहित शर्मा खेळणार नाही? हेआहे कारण
कराची येथील नॅशनल स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघ 38.2 षटकात 179 धावांवर सर्वबाद झाला. रूटने सर्वाधिक 37 धावा केल्या. तर जोस बटलरने २१ आणि जोफ्रा आर्चरने २५ धावांचे योगदान दिले. मार्को जॅन्सन आणि वेन मुल्डरने प्रत्येकी 3 बळी घेतले.
रॅसी व्हॅन डर ड्युसेनने धावांचा पाठलाग करताना 72 धावांची नाबाद खेळी केली. हेन्रिक क्लासेन 64 धावा करून बाद झाला. या दोघांनी 122 चेंडूत 127 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने २ बळी घेतले. ब गटातून ऑस्ट्रेलियानेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तानचे संघ बाद झाले.