Charlie Munger passed away : प्रसिद्ध गुंतवणूक फर्म बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर (Charlie Munger) यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी (दि.28) रात्री कॅलिफोर्नियातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बर्कशायर हॅथवेने निवेदन जारी करून मुंगेर यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. चार्ली मुंगेर हे जगातील प्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरन बफे (Warren Buffett) यांच्या जवळचे होते. एवढेच नव्हे तर, अनेक गुंतवणुकदार मुंगेर यांना वॉरेन बफे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. चार्ली 1 जानेवारीला त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करणार होते.
वाद पेटला! दत्ता दळवींच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड; ठाकरे गट आक्रमक, ‘जशास तसं उत्तर..,’
बफे मुंगेर यांची पहिली भेट
1 जानेवारी 1924 रोजी जन्मलेला चार्ली मुंगेर यांनी हार्वर्डमधून कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी आर्थिक क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान मुंगेर यांची बफे यांच्याशी पहिली भेट 1959 मध्ये झाली. आर्थिक गोष्टींकडे बघण्याचा दोघांचा दृष्टीकोण आणि समजुतीने दोघांनाही अधिक जवळ आणले.
प्रेमासाठी पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली! नसरुल्लासोबत लग्न करुन बनली होती फातिमा…
गुंतवणुकीपूर्वी बफे घ्यायचे चार्लीचा सल्ला
वॉरेन बफे यांचे नाव जगभरातील यशस्वी गुंतणूकदार म्हणून घेतले जाते. मात्र, त्यांच्या या गुंतवणुकीमागे खरं मार्गदर्शन होतं ते चार्ली मुंगेर यांचे. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्नी बफे चार्ली यांचा सल्ला घेत असे. 1962 मध्ये त्यांनी मुंगेर, टोलेस अँड ओल्सन ही आर्थिक कायदा संस्था स्थापन केली. फोर्ब्सनुसार, चार्ली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 182 व्या क्रमांकावर होते. त्यांची एकूण संपत्ती 2.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
बर्कशायर हॅथवेचा सांगितला होता फ्यूचर प्लान
2021 मध्ये बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीत चार्ली मुंगेर यांनी कंपनीच्या भविष्यातील नियोजनाबद्दल सांगितले होते. यावेळी त्यांनी नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. बफे यांच्यानंतर त्यांनी कंपनीचे उपाध्यक्ष ग्रेग एबेल यांच्याकडे कंपनीची धूरा देण्याचे सुचवले होते.
बफे यांना ‘सिगार बट’ थ्योरी देणारा चार्ली
संकटात सापडलेल्या कंपन्या सवलतीत खरेदी करण्याचा सल्ला चार्ली यांनीच बफे यांना दिला होता. 1950 च्या दशकात ही थ्योरी खूप चांगली काम करत होती. त्यानंतर त्यांच्या या थ्योरीला ‘सिगार बट’ची थ्योरी असे संबोधण्यात आले.
चार्लीची भूमिका कायम स्मरणात राहिल
जगातील प्रसिद्ध गुंतवणूक फर्म बर्कशायर हॅथवेच्या स्थापनेत चार्ली मुंगेर यांची मोलाची भूमिका होती. त्यांच्या निधनाने बफे यांच्यासह जगभरातील गुंतनणूकदारांमध्ये निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘चार्लीची प्रेरणा, बुद्धिमत्ता आणि सहभागाशिवाय बर्कशायर हॅथवे आज जिथे आहे तिथे आणता आले नसती. कंपनीला मोठे करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली जी कायम स्मरणात राहील, अशा भावना बफे यांनी मुंगेर यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या आहेत.