Elon Musk : श्रीमंतांच्या यादीत पुन्हा ‘नंबर वन’

Elon Musk : श्रीमंतांच्या यादीत पुन्हा ‘नंबर वन’

नवी दिल्ली : जगातील अब्जाधीशांची (Billionaires in the world)नवी यादी प्रसिद्ध झालीय. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्कनं (Elon Musk)पुन्हा एकदा या यादीत पहिला क्रमांक पटकावलाय. या यादीनुसार, आता मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलाय.

मस्कच्या संपत्तीत गेल्या 24 तासांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. आता इलॉन मस्कची संपत्ती 187 अब्ज डॉलर्स इतकी झालीय. त्यामुळं 185 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले, आत्तापर्यंतचे पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault)यांची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झालीय.

‘तुझी लायकी किती’… लतादीदींच्या एकेरी उल्लेखावर नेटकरी Ranu Mandalवर संतापले

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index)नुसार, इलॉन मस्कच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 6.98 अब्ज डॉलर्स इतकी वाढ झालीय. त्यामुळं इलॉन मस्कनं या यादीत पुन्हा अव्वल क्रमांक मिळवलाय.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट तर तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत. त्यांची संपत्ती 117 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्या खालोखाल बिल गेट्स आणि वॉरन बफेट आहेत. त्यांची अनुक्रमे संपत्ती 114 आणि 106 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, इलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत ‘नंबर वन’ ठरले असले तरी, फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या क्रमांकावर आणि बर्नार्ड ॲरनॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube