‘तुझी लायकी किती’… लतादीदींच्या एकेरी उल्लेखावर नेटकरी Ranu Mandalवर संतापले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 02 28T143624.345

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यांना जाऊन एक वर्ष झाले असले तरी लतादीदी या आपल्यातच असल्याचे त्यांचे चाहते म्हणत असतात. अशा या कलाकराचा अपमान कोणीही सहन करणार नाही. सोशल मीडियावर काही वर्षापूर्वी फेमस झालेल्या राणू मंडलने ( Ranu Mandal ) लतादीदींचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केला आहे. यावरुन नेटकऱ्यांनी राणू मंडलला चांगलेच धारेवर धरले आहे.

राणू मंडल ही काही वर्षांपूर्वी अचानकपणे तिच्या गाण्यामुळे प्रसिद्धीमध्ये आली होती. सोशल मीडियावर तिचे गाणे व्हायरल झाले होते. यानंतर राणू मंडलला काही टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये देखील बोलवण्यात आले होते. तिला काही संगीतकारांनी गाणी म्हणण्याची संधी देखील दिली होती. यामुळे अचानकपणे ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसायला लागली होती. पण तिच्या विचित्र बोलण्यामुळे ती बाजूला गेली.

(ENG vs NZ : न्यूझीलंडने एका धावेने विजय मिळवत रचला इतिहास ! इंग्लंडला अवघ्या १ धावांनी हरवलं)

आता तिने चक्क गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एकेरी उल्लेख केला आहे. राणूने लतादीदींचा एकेरी उल्लेख केलेला व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यावरुन तिच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.  या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राणू मंडल म्हणते की, मी जे गाणं म्हणणार आहे ते कोणत्या लता-फताचे नाही, जिने हे गाणे म्हटले आहे तिचाही आवाज भारी आहे. यानंतर ती ‘अगर दुश्मन’ नावाचे गाणे म्हणते.

दरम्यान तिच्या या व्हायरल व्हीडिओनंतर नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. तुझी लायकी किती तु बोलती किती, आपण कोण आपला आवाज काय, अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी राणू मंडलला चांगलेच झापले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube