ENG vs NZ : न्यूझीलंडने एका धावेने विजय मिळवत रचला इतिहास
ENG vs NZ 2nd Test : न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या सामन्यात इंग्लंडचा शानदार पराभव करत मोठा इतिहास रचला आहे. (ENG vs NZ) याबरोबरच इंग्लंडचा १४६ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. दोन कसोटी सामन्यातील मालिकेत दुसरा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला आहे, ज्यात यजमानांनी इंग्लिश संघाचा फक्त एका धावेनी पराभव केला. तसेच मालिकेत १-१ अशी बरोबर साधली आहे.
न्यूझीलंडने इंग्लंडच्या समोर विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य ठेवले, पण त्यांच्या या दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लिश संघ २५६ धावांवर थंड झाला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ९५ धावांची खेळी करण्यात आली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यावेळी, न्यूझीलंडच्या विजयाचे नायक नील वॅगनर आणि टीम साऊथी ठरली आहे. ज्यांनी अनुक्रमे ४ आणि ३ विकेट घेतले.
१ धावेनी विजय मिळविला
टीम साऊथीच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडचा १ धावेनी पराभव करून मोठा इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांनी सामना जिंकणारा न्यूझीलंड हा जगातील दुसरा संघ ठरला गेला आहे. या अगोदर देखील १९९३ मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ धावेने विजय मिळवून वेस्ट इंडिजने हा विक्रम केला होता, परंतु तब्बल ३० वर्षांनंतर न्यूझीलंडने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवून या यादीत आपले नाव कोरले.
ICC कडून टी-20 वर्ल्डकप संघाची घोषणा; फक्त एका भारतीय खेळाडूला मिळाले स्थान
इंग्लंड पहिल्यांदा कसोटी सामना हरला
इंग्लंडच्या कसोटी सामनाच्या १४६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संघाला फॉलोऑन करत मोठा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यामध्ये इंग्लंडने आपला पहिला डाव ८ विकेट गमावून ४३५ धावांवर घोषित केला. पाहुण्या संघाला येथे ५०० ते ६०० धावा करण्याची मोठी संधी होती. परंतु, जो रूट १५३ धावा केल्यावर क्रीजवर उपस्थित होता. मात्र स्टोक्सच्या आक्रमक विचारसरणीने इंग्लंडने आपला पहिला डाव लवकरच सावरता पाय काढला.
यानंतर न्यूझीलंडने पहिला डाव २०९ धावांत गुंडाळला गेला आणि इथे बेन स्टोक्सने सर्वात मोठी चूक केली. २२६ धावांची आघाडी घेत स्टोक्सने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला गेला. इंग्लंडचे गोलंदाज अगोदरच थकले होते, यामुळे किवी फलंदाजांनी याचा फायदा घेत दुसऱ्या डावात ४८३ धावांची मोठी मजल मारली. यादरम्यान केन विल्यमसनने १३२ धावांची शतकी खेळी करण्यात आली.