Chat GPT : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot) सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यात आता एक अश्चर्यकारक घटना घडली आहे. ती म्हणजे डॉक्टरांना जमले नाही ते चॅट जीपीटीने करून दाखवलं आहे. एका तरूणाच्या आजाराचं निदान डॉक्टर करू शकले नाही मात्र चॅट जीपीटीने ते अचूक केलं आहे.
Maratha Reservation : यवतमाळमध्ये मराठा आंदोलन चिघळलं; उपोषणाच्या मंडपातच आंदोलकाने विष घेतलं
काय आहे प्रकरण?
एक तरूण गेल्या काही वर्षांपासून पाठीच्या मनक्यामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. त्यासाठी त्याने एक नाही तर 17 डॉक्टरांकडून त्यासाठी उपचार घेतले मात्र त्याच्या आजाराचं निदान कोणतेही डॉक्टर करू शकले नाही. त्यानंतर त्यांनी चॅट जीपीटीचा आधार घेत आजाराच्या निदानाचा प्रयत्न केला. चॅट जीपीटीने या तरूणाच्या आजाराचं अचूक निदान केलं. ही घटना अमेरिकेमध्ये घडली आहे.
पाकिस्तानात राजकीय हालचालींना वेग; माजी पंतप्रधान नवाज शरीफ ‘या’ तारखेला परतणार
निदान कसं करण्यात आलं?
या तरूणाच्या आईने एका वृत्त वाहिनीला आपल्या मुलाच्या चॅट जीपीटीने केलेल्या निदानाबद्दल सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलाच्या त्रासाचे सर्व लक्षण चॅट जीपीटीला सांगितले. त्याच्या एमआरआयमधून ही माहिती चॅट जीपीटीन गोळी केली. त्यानंतर या तरूणाच्या चॅट जीपीटीने या तरूणाच्या आजाराचं अचूक निदान केलं. त्याला टिथर्ड कॉर्ड सिंड्रोम असल्याचे निदान चॅट जीपीटीने केले.
MES च्या अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे; आनंदी पाटील उपाध्यक्षा
दरम्यान आजाराचं निदान करणारं एआय टूल चॅट जीपीटी आता माणसाची मनं ही वाचू शकणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या (University of Texas at Austin) शास्त्रज्ञांच्या टीमने एआय मॉडेल विकसित केले आहे. जे तुमचे विचार वाचू शकते. सिमेंटिक डिकोडर म्हणून ओळखली जाणारी नॉन-इनवेसिव्ह एआय प्रणाली नेचर न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. अभ्यासानुसार, ते रिअल टाईममध्ये मेंदूच्या क्रियाकलापांचे वाचन आणि भाषांतर करू शकते.
हे एआय टूल पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी आणि अपंगासाठी वरदानापेक्षा कमी नाही. हे साधन एआय आधारीत डिकोडर आहे. जे मेंदूच्या क्रियाकलापांचा मागोवा घेते आणि एखादी व्यक्ती काय विचार करत आहे. किंवा त्याच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज लावते. या संशोधनादरम्यान, तीन लोकांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. आणि त्यादरम्यान, त्यांना एक गोष्ट सांगितली गेली. संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, आता मेंदूचे रोपन न करता लोकांच्या मानसिक स्थितीची माहिती घेतली जाऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट ऐकते. किंवा एखाद्या गोष्टीची कल्पना करते, तेव्हा हे साधन त्याचे मजकुरात रुपांतर करण्यास सुरूवात करते. यासाठी लवकरच चॅटजीपीटी सारखे एय आय टूल विकसित केले जाईल.