Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेलं असतानाच या आंदोलनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. उपोषण सुरु असतानाच एका मराठा आंदोलकाने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. यवतमाळमधील उमरखेडमध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
iPhone 15 सीरीज आज होणार लाँच, भारतात किंमत किती असेल?
अशोक देवराम जाधव (35, रा. जेवली. ता. उमरखेड) असं या तरुणाचं नाव असून या घटनेनंतर तरुणाला तत्काळ यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या घटनेमुळे राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले असल्याचं बोललं जात आहे.
मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी यवतमाळच्या उमरखेड तहसील कार्यालयाच्या मैदानात गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे, या उपोषणाला यवतमाळच्या अनेक सामाजिक संघटनांसह अनेक पक्षाकडून पाठिंबा देण्यात येत आहे. या उपोषणाला सचिन घाडगे, शिवाजी पवार, सुदर्शन जाधव, गोपाल कलाने, शरद मगर हे तरुण बसले आहेत. तरुणांच्या उपोषणाला मराठा समाजबांधवांकडून दररोज भेटी देण्यात येत आहेत.
Maratha Reservation चा हिरो झळकणार पडद्यावर; जरांगेंच्या चित्रपटाचं पोस्टर लाँच…
यामध्ये बारा, नागापूर, उंचवडद, कुपटी, तिवडी, वाणेगाव, माणकेश्वर, दिवटपिंपरी, देवसरी या गावातील शेकडो समाजबांधव व भगिनी या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आले. यावेळी उपस्थितांना काही जण मार्गदर्शन करीत असताना तालुक्यातील जेवली येथील अशोक जाधव हा तरुण उपोषणकर्त्यांसोबत बोलण्यासाठी मंडपात गेला व आरक्षणाची मागणी करीत त्याच ठिकाणी बसून त्याने खिशातील कीटकनाशकाची बाटली काढून त्यातील विषारी औषध प्यायले.
वाकचौरेंच्या प्रवेशाने शिर्डीचे राजकारण तापले, निष्ठावंत शिवसैनिकांचे थेट बाळासाहेबांना पत्र
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे याचं जालन्यातील आंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरु आहे, सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असून अद्याप सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे यांनी अद्यापही आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
दरम्यान, उमरखेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर मराठा आंदोलकांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. आता मराठा समाज कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणातीही अनूसुचित प्रकार घडू नये, यासाठी आंदोलनस्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.