वाकचौरेंच्या प्रवेशाने शिर्डीचे राजकारण तापले, निष्ठावंत शिवसैनिकांचे थेट बाळासाहेबांना पत्र
Shirdi politics : गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील राजकारण तापले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना सेनेत प्रवेश दिल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते बबनरा घोलप नाराज झाले होते. त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. घोलपांच्या राजीनाम्यानंतर शिर्डीतील ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 2014 ला वाकचौरे यांनी लोकसभेला शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. आता पुन्हा वाकचौरेंना लोकसभेसाठी तिकीट मिळणार असल्याची चर्चा असल्याने घोलप समर्थक नाराज झाले आहेत. त्यामुळे कोपरगाव येथील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी थेट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे लिहिलेले पत्र सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे.
भरत मोरेंनी पत्रात काय लिहिलंय?
पत्रास कारण की, आपल्या आदेशानुसार आम्ही शिवसैनिक आजपर्यंत उद्धवसाहेबांच्या आणि आदित्यसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे निष्ठेने उभे होतो आणि राहणार आहे. साहेब, अनेक आमदार, खासदा, नगरसेवक, उपनेते, ज्येष्ठ कार्यकर्ते निघून गेले नाही तर त्यांनी शिवसेनेशी गद्दारीच केली. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांची मानसिकता खिळखिळी होवू दिली नाही ती निष्ठावंत शिवसैनिकांनी… मोठ्या गद्दानीनंतर आता शिवसेना संपली असं बोलणाऱ्यांचे दात घश्यात घातले ते निष्ठावंत शिवसैनिकांनी.. काही न मिळवता, न पदरात पाडता नशिबी फक्त पोलिसांच्या लाठ्याकाठ्या.. विरोधकांच्या षडयंत्रात संसाराची राखरांगोळी करुन घेतली… तडीपाऱ्या भोगल्या… काहींनी तर आपले प्राणही गमावले.. काही निष्ठावंत शिवसैनिक आजही स्वखर्चाने गर्दी करुन शिवसेनेची इज्जात वाचवत उपाशी पोटी ‘जय भवानी’ च्या घोषणा देवून घरच्या भाकरी सोबत शिव्या खायला घरी पोहचतात…
स्थानिक राजकारणापाई कैक निष्ठावंत शिवसैनिक देशोधडीला लागले.. कुटुंब उध्वस्त झाले तरीही निष्ठावंत शिवसैनिक आजही दुर्लक्षितच का केला जातो आहे साहेब..? याचे उत्तर आम्हाला आपल्याकडून पाहिजे आहे. निष्ठावंत शिवसैनिकांची आर्तहाक आणि होत असलेल्या उद्धवसाहेबांच्या आजूबाजूच्या बडव्यांकडून अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी निष्ठावंताची सामुदायिक किंचाळी उद्धवसाहेबांच्या कानावर कधी पडले साहेब?
साहेब आमचं निष्ठावंताचं मनोगत वाचून आपण नक्की पक्ष हिताचा आदेश द्याल अशी अपेक्षा आहे. शिवरायांना आई भवानी मातेने साक्षात्कार देवून भवानी तलवार दिली. दृष्टांच्या तावडीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी.. तसाच साक्षात्कार आपण स्वत: उद्धवसाहेबांना देऊन भवानी तलवारीच्या जागी शिवसैनिकांना समजून घेण्याची इच्चा आणि ताकद द्यावी तरच आणइ तरच आपले भगवा फडकवण्याचे स्वप्न सत्यात साकारता येतील तशी आज परिस्थिती आहे साहेब..
मुख्यमंत्र्यांसह आमदार अपात्र ठरणार?; विधिमंडळात 14 सप्टेंबरला प्रत्यक्ष सुनावणी…
आजचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ज्वलंत उदाहण बघा साहेब.. गद्दारी करुन आलेल्या वाकचौरेंना पुन्हा पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांनी प्रवेश दिला. प्रवेशावेळी सगळ्या भामट्यांनी पैशावर खोट्या शिवसैनिकांची गर्दी मातोश्रीवर नेली. लबाडी खोटारडेपणा करणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे स्थानिक माजी पदाधिकारी, साखरसम्राटांची बक्कळ नोटांची सुपारी घेऊन निष्ठावंत शिवसैनिकांना डिवचण्याचे कटकारस्थान केले.
बबन घोलपांसारख्या निष्ठावंत नेतृत्वाचा पावलोपावली नियोजित तटबंदी करुन अपमान करत घोलपांना बिथरलेल्या साखरसम्राटांच्या पैशावर बडव्यांना खुश केले. पुन्हा भोळ्या पक्षप्रमुखांचा घात केला. साहेब आता सोशल मिडियावर कुठल्याही गोष्टी गुपित न राहता काही सेकंदात सार्वजनिक गोष्टी होतात. त्यामुळे किती करोड आले आणि कोणाकोणाच्या वाट्याला कोणी स्वत:ला ठेवून किती दुसऱ्याला दिले, हे लगोलग कळतं.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले? गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
बडव्यांच्या शिर्डी आणि अनेक ठिकाणी शिवसेनेच्या माजी पदाधिकारी दलालांच्या नावावर कुठे कुठे जमिनी आहेत हे ही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुराव्यानिशी मिळते साहेब… मग साहेब एकनाथ शिंदे यांनी जे केले ते योग्य होते? असे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांची मानसिकता होवू लागली आहे. साहेब उद्धवसाहेबांची लाट जरूर होती पण आता बडव्यांच्या लाचखोरीत मातोश्री पुन्हा बदना होत आहे. नवीन प्रवेश केलेल्या गब्बर नेत्यांना, त्यांच्या मुलाला, पुतण्याला सरळ उपनेतेपद दिले जाते आणि मसनात जाईपर्यंत निष्ठावंताला साधं शाखाप्रमुख पदही दिलं जात नाही. शेवटी अंतर्गत संघर्षात निष्ठावंताचा बळी दिला जातोय..