’40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण..,’; अपात्र आमदारांच्या प्रकरणावर राऊतांचा घणाघात

’40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण..,’; अपात्र आमदारांच्या प्रकरणावर राऊतांचा घणाघात

40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण त्यांना लावायचा नाही, या शब्दांत प्रलंबित असलेल्या अपात्र आमदारांच्या सुनावणीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी केली आहे. दरम्यान, मागील वर्षी सुरु असलेला सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानंतर आता विधीमंडळात येऊन ठेपलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांचं अपात्र प्रकरणाचा निर्णय विधीमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. त्यानंतर विधीमंडळ अध्यक्ष या प्रकरणी काय निकाल देणार? याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं. अखरे येत्या 14 सप्टेंबरला सुनावी सुरु होणार असून त्यावर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, राहुल नार्वेकरांनी निकाल लावायला एक वर्ष घेतलं आहे. ४० आमदारांचा निकाल लावायला ४० तास पुरेसे आहेत. घटनेतून निकाल लावायचं काम करायचं आहे. चिन्हावर निवडून आले आणि फूट पाडून बाहेर गेलेत. १० शेड्युल्डनुसार निर्णय द्यायचा आहे.घटनेतील १० व्या शेड्युलनुसार राहुल नार्वेकरांना निर्णय द्यायचा आहे. त्यांना १० वी घटना माहित नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही तज्ज्ञ पाठवू. ४० तासांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचा निकाल लागू शकतो, पण त्यांना लावायचा नाहीय. हे घटनेची पायमल्ली करत आहेत. फालतू राजकारण करून महाराष्ट्राला अस्थिर करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

Disqualification case of MLA :
Video : मराठा आरक्षणाबाबत शिंदेंनी दिली मोठी अपडेट; आता लक्ष संंध्याकाळच्या सर्वपक्षीय बैठकीकडे

येत्या 14 सप्टेंबर रोजी अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 14 सप्टेंबरला शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे. 14 सप्टेंबर रोजी दुपारी वाजल्यापासून या सुनावणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

इंडिया आघाडी विरूद्ध आजी-माजी पंतप्रधान एकत्र, लोकसभा निडणुकांसाठी जेडीएस-भाजप युतीची घोषणा

ही सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार असून, एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवताहेत; शरद पवारांचा घणाघात

अपात्र आमदारांच्या प्रकरणावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले होते, आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायत असलेल्या याचिकेवर सर्व कारवाई पूर्ण झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा राज्यकर्ते सन्मान करणार असून नागरिक संविधानावर विश्वास ठेवतात ते न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणार असल्याचा विश्वास असल्याचंही ते म्हणाले आहेत. नागरिकांवर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच मी माझं काम जबाबदारीने पार पाडत आहेत.

दरम्यान, राज्यात गाजलेल्या संत्तासंघर्षानंतर आता राजकीय वर्तुळाचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. विधीमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर राज्यातील सत्तांतराचे समीकरण बदलणार असल्याचं बोललं जात आहे. आता या प्रकरणी राहुल नार्वेकर काय निकाल देणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube