The Great Indian Family : मानुषी अन् विकीच्या भावनांचा रोलर-कोस्टर राइड; ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’चा ट्रेलर रिलीज

The Great Indian Family : मानुषी अन् विकीच्या भावनांचा रोलर-कोस्टर राइड; ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’चा ट्रेलर रिलीज

The Great Indian Family : ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family ) या चित्रपटातून अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मानुषी ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलीवूड मध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले.

Manoj Jarange : पाच अटी अन् 12 ऑक्टोबरला विराट सभा; जरांगे पाटील काय म्हणाले?

पृथ्वीराजमधील तिच्या उल्लेखनीय पदार्पणानंतर आता ती विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबतीने ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ मध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. द ग्रेट इंडियन फॅमिली हा एक चित्रपट भावनांचा रोलर-कोस्टर राइड असल्याच कळतंय.

मानुषी छिल्लर एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारताना बघायला मिळणार असून जिचा प्रवास विकीच्या पात्राला आधार देणारा आधारस्तंभ म्हणून उलगडणार आहे. प्रेक्षक त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री बघण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे आणि यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती असून प्रीतमने या चित्रपटाला संगीत दिले आहे.

मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा

ट्रेलरमधून मानुषीच्या करिष्माने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. पण आता सगळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मानुषीच्या तेजस्वी मोहकतेसह ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ एक अनोखा चित्रपट असणार यात शंका नाही. मानुषी छिल्लरचे बॉलीवूडमधील काम बघता येणाऱ्या चित्रपटात ती नक्कीच पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. द ग्रेट इंडियन फॅमिली 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून एक उत्तम चित्रपट सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube